दोन महिन्यांनी धावली केएमटी 

दोन महिन्यांनी धावली केएमटी 
Updated on

कोल्हापूर : महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची (केएमटी) बससेवा आजपासून सुरु झाली. मात्र या सेवेला प्रवाशी वर्गातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दिवसभरात 10 बसेसच्या माध्यमातून 51 फेऱ्या झाल्या. या सेवेचा लाभ आज 500 प्रवशांनी घेतला आहे. 

शहरातंर्गत तसेच आजूबाजूच्या गावांना प्रवाशी सेवा देण्याचे काम महापालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत करण्यात येते. लॉकडाउनला 24 मार्चला सुरूवात झाल्यापासून महापालिकेची दोन महिन्यापासून ही सेवा बंद होती तथापी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानंतर आजपासून ही सेवा सुरु झाली. सकाळी सात वाजता केएमटी सुरु झाली. सोशल डिटस्टन्सचे पालन करण्यासाठी कमीत कमी प्रवाशी बसविले. 

पहिल्या टप्यात शाहू मैदान बस नियंत्रण केंद्र ते मार्केट यार्ड, शाहू मैदान बस नियंत्रण केंद्र ते विवेकानंद कॉलेजमार्गे शुगरमिल, गंगावेश ते एस.टी.स्टॅंड, शिवाजी चौक ते कळंबा,शिवाजी चौक ते क्रांतीसिंह नानापाटीलनगर, शिवाजी चौक ते बोंद्रेनगर, तसेच शिवाजी चौक ते जरगनगरमार्गे आर.के.नगर गणपती मंदिर व शिवाजी चौक ते राजारामपुरीमार्गे आर.के.नगर गणपती मंदिर या मार्गांवर 10 बसेसद्वारे सकाळी 7.00 ते सायंकाळी7.00 पर्यंत बससेवा सुरू होती. चालक,वाहकांना डयुटीवर असताना हॅंडग्लोज व मास्क बंधनकारक केले आहे. 
तिकीट देण्यापूर्वी वाहकाकडून प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायजर देण्यात येईल. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन केएमटीने केले आहे. 

10 हजारांचा तोटा 
केएमटीने आज 51 फेऱ्या केल्या. दिवसभरात 750 किलोमीटर बस धावली. यासाठी डिझेलवर 14 हजार रुपयांचा खर्च झाला. प्रत्यक्षात 500 प्रवशांनी या सेवेचा लाभ घेतल्याने केएमटीला अवघे 4700 रुपये मिळाले. केएमटीला आज सुमारे दहा हजारांचा तोटा सहन करावा लागला. 
 

* मुक्त सैनिक वसाहत चौक 
* दसरा चौक 
* माधुरी बेकरी चौक 
* बागल चौक 
* शेंडा पार्क चौक 
* साई मंदिर चौक 
* चिवा बाजार चौक आपटेनगर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com