सिद्धेनेर्ली (कागल) नदी किनारा येथे तरुणावर चाकू हल्ला...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

सिद्धनेर्ली नदी किनारा येथे युनुस इस्माईल शेख आणि रोहित आनंदा पाटोळे हे दोघेजण राहतात. ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

कागल - गाडीवरून उतरण्याच्या किरकोळ कारणावरून दोन मित्रात वाद झाला. या वादातून एकाने दुसऱ्यावर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना सिध्दनेर्ली, नदी किनारा ( ता. कागल ) येथे शुकवारी रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोघांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सात जूलैपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सिद्धनेर्ली नदी किनारा येथे युनुस इस्माईल शेख आणि रोहित आनंदा पाटोळे हे दोघेजण राहतात. ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. शुकवारी दोघेजण मोटरसायकलीवरून कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. परत येत असताना दऱ्याचे वडगांव येथे गाडीवरून उतरण्याच्या कारणावरून दोघात भांडण झाले. याचा राग मनात धरूण रोहित पाटोळे आणि त्याचा भाऊ राहूलने युनुसवर त्याच्या घरात जाऊन चाकू आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत युनुस जखमी झाला. मारहाण सोडवायला गेलेल्या युनूसची
आई रुक्साना आणि बहिण करिश्मा या दोघींनाही मारहाण करण्यात आली.

वाचा - धक्कादायक : कोल्हापूर जिल्ह्यात परत कोरोनाचा कहर सुरु ; 23 नवे कोरोना बाधित आले समोर...

युनुसने रोहित पाटोळे आणि राहूल पाटोळे यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीसांनी रोहित व राहूलला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रितमकुमार पुजारी हे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knife attack on youth at Siddhenerli Kagal river bank

टॅग्स
टॉपिकस