भुदरगड तालुक्यात चालणार महिलाराज     

धनाजी आरडे
Wednesday, 27 January 2021

तहसीलदार अश्‍विनी अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थीनीच्या हस्ते चिठ्ठीद्वारे  सोडत काढण्यात आली.

गारगोटी : भुदरगड तालुक्यात ९७ पैकी ४९ ग्रामपंचायतीत महिलांना सरपंच पदाचा मान मिळणार आहे. येथील पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी सरपंच पदाची आरक्षणाची सोडत झाली. तहसीलदार अश्‍विनी अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थीनीच्या हस्ते चिठ्ठीद्वारे  सोडत काढण्यात आली. 

प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण असे  
अनुसूचित जाती : बेगवडे, गंगापूर, दिंडेवाडी, करडवाडी, भाटिवडे.

अनुसूचित जाती महिला : तांब्याचीवाडी, चिक्केवाडी, मुरूक्टे, शेळोली, कोनवडे, पिंपळगाव, सोनुर्ली.

नागरिकांचा मागास प्रवर्ग : वाघापूर, आकुर्डे, कूर, कडगाव, मडूर, निळपण, आदमापूर, मडिलगे खुर्द, पाचवडे, हेळेवाडी, नागणवाडी, देवकेवाडी, भेंडवडे. 

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : खानापूर, कलनाकवाडी, मठगाव-मानी, मानवळे-केळेवाडी-जकीनपेठ, मेघोली, पाल, हणबरवाडी, नवले, बिद्री-पेठशिवापूर, आरळगुंडी, वरपेवाडी, राणेवाडी, मिणचे खुर्द. 

सर्वसाधारण महिला : मडिलगे बुद्रुक, मुदाळ, कोंडोशी-दासेवाडी, अनफ बुद्रुक, तिरवडे-कुडतरवाडी, दारवाड, मिणचे बुद्रुक, फये, पडखंबे, देऊळवाडी, ममदापूर, नितवडे, नवरसवाडी, भालेकरवाडी-थड्याचीवाडी, सालपेवाडी, डेळे-चिवाळे, वासनोली, पारदेवाडी, न्हाव्याचीवाडी, अंतिवडेे, म्हासरंग-उकीरभाटले, फणसवाडी, वेसर्डे, शेणगाव, आंबवणे, नांदोली-करंबळी, व्हनगुती, देवर्डे, निष्णप-कुंभारवाडी, पुष्पनगर, दोनवडे.

हे पण वाचा - राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर

 

 सर्वसाधारण पुरूष : गारगोटी, नाधवडे, म्हसवे, टिक्केवाडी, सोनारवाडी, शिवडाव, कोळवण-पाळेवाडी, पाळ्याचाहुडा, लोटेवाडी, पंडिवरे, पाचर्डे, शिंदेवाडी, दोनवडे, पळशिवणे, बारवे, मोरेवाडी, हेदवगडे-गिरगाव, तांबाळे, वेंगरूळ, पाटगाव, कारीवडे, बामणे, अनफ खुर्द, अंतुर्ली, पांगीरे, खेडगे-एरंडपे, चांदमवाडी, बेडीव, बसरेवाडी, नांगरगाव.
 यावेळी नायब तहसीलदार संदीप भूतल, चेतन कोणकर, राहुल पाटील, भरत पोळ, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
                      
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur bhudargad taluka gram panchayat reservation