'भाविकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका' 

kolhapur bjp protest against maharashtra government on temples
kolhapur bjp protest against maharashtra government on temples

कोल्हापूर - कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मंदिरे बंद केली. मात्र आता बार, रेस्टॉरंट, मॉल, वाईनशॉप सर्व काही सुरू आहेत पण मंदिरे बंदच ठेवण्यात आली आहेत. ज्यांनी आज पर्यंत हिंदुत्व जगले, अध्यात्म मांडले ते आता कुठे तरी कॉंग्रेसमय झाले आहेत. त्यामुळे त्यांना हे काही ऐकू जात नाही. भाविकांच्या सहनशिलतेचा अंत बघू नका. आमची मंदिरे, आमची श्रद्धास्थाने त्वरीत खुली करा. असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी राज्य सरकारला दिला. मंदिरे खुली करा या मागणीसाठी आज मिरजकर तिकटी येथे भाजपचे लाक्षणिक उपोषण झाले. त्यामध्ये ते बोलत होते. 

सकाळी भाजपचे कार्यकर्ते मिरजकर तिकटी येथे एकत्र आले. त्यांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या. "मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार' अशा घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राहुल चिकोडे म्हणाले, "देशभरामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला होता, त्यावेळी आम्ही मंदिरे उघडा असे म्हंटले नाही पण सध्या मॉल, मद्यालये, देशी दारू दुकाने सुरु, पण मंदिरे बंदच आहेत. हिंदूधर्मामध्ये आध्यात्माला अत्यंत महत्व आहे. कोणताही भाविक मंदिरामध्ये गेला कि त्याचा मानसिक ताण कमी होतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सातत्याने मंदिरे उघडण्याची मागणी आहे की, आता तरी मंदिरे उघडा पण सरकारला हे ऐकूच गेले नाही. त्यामुळे हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. आमची मंदिरे, आमची श्रद्धास्थाने त्वरीत खुली करा.' 

यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, नगरसेविका उमा इंगळे, प्रमोदिनी हर्डीकर, गिरीष साळोखे, विजयसिंह खाडे-पाटील, विशाल शिराळकर, अप्पा लाड, चंद्रकांत घाटगे यांनी मंदिरे उघडा या बाबतच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सरकारला मंदिरे उघडण्याची बुद्धी दे असे साकडे यावेळी घालण्यात आले. या आंदोलनात सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, दीपक काटकर, प्रदीप उलपे, सुनिलसिंह चव्हाण, दिग्विजय कालेकर, मंडल अध्यक्ष संतोष माळी, भरत काळे, रवींद्र मुतगी, प्रग्नेश हमलाई, संजय जासूद यांच्यासह कर्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

भजन, शंखनाद आणि अंगात येणे सुद्धा 

आंदोलनादरम्यान पंत बाळेकुंद्री महाराज भक्त मंडळाने भजन सादर केले. भक्ती गीतेही गाण्यात आली. सुनिलसिंह चव्हाण यांनी शंखनादही केला. लाक्षणिक उपोषणा दरम्यान एका महिला कार्यकर्त्यीच्या आंगात आले. हा मात्र चर्चेचा विषय ठरला. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com