अस फक्त आमच्या कोल्हापुरात घडत: म्हशी चालल्या पार्लरला

kolhapur buffalo Parlor story by rajkumar chougule
kolhapur buffalo Parlor story by rajkumar chougule
Updated on

कोल्हापूर : शहरातील जलसाठ्यामध्ये जनावरे धुण्यास बंदी घालताच कोल्हापुरात आता या जनावरांसाठी शॉवर बाथसोबत पार्लरचीच सोय करण्यात आली आहे. महापालिकेच्या या नव्या उपक्रमामुळे पंचगंगा, रंकाळ्यासह तलावांतील पाण्याचे प्रदुषणही थांबणार आहे. दुध कट्ट्यावरील धारोष्ण दुध पिणाऱ्या कोल्हापूरकरांनी त्यांच्या सोयीसाठी मंगेशकर नगरात नाविण्यपूर्ण योजनेच्या निधीतून हा आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे. म्हशींच्या या पार्लरसाठी तब्बल 15 लाखांचा निधी खर्च केला आहे. 


कोल्हापुरात म्हैसपालन हा पारंपारिक व्यवसाय आहे. यामुळे आजही येथे अनेक कुटुंबे म्हशींचे पालन करतात. धारोष्ण दूध पिण्याची सोय केवळ कोल्हापुरात असून त्यासाठी तीन चार ठिकाणी कट्टे बांधण्यात आले आहेत. या म्हशींना रोज धुण्यासाठी पंचगंगा, रंकाळा अथवा शहराच्या आसपास असणाऱ्या तलावात नेले जात होते. यामुळे पाण्याचे प्रदुषण होत असल्याने या जलसाठ्यात त्यांना धुण्यास बंदी घालण्यात आली आहे. आत्तापर्यंत याबाबत आवाहन केले जात होते, यावेळी मात्र कडक निर्बंध घालण्यात आल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली. 


या पार्श्वभूमीवर शहरातील मंगेशकर नगर येथे माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या भागात एक जुनी खण आहे. त्या खणीतील पाण्याची वापर यासाठी करण्यात आला आहे. म्हैस धुण्यासाठी शॉबर बाथ सुरू करण्यात आला आहे. एकावेळी आठ ते दहा म्हशीना आंघोळ घालण्याची येथे सोय आहे. यामुळे रोज दुपारनंतर येथे शहरातील बहुसंख्य म्हशी शॉवर बाथचा आनंद लुटतात. पाणी वाया जाऊ नये म्हणून वापरलेले पाणी बागेत सोडण्यात आले आहे. येथे त्यांच्यासाठी पार्लरही सुरू करण्यात आले आहे. त्यांचे केस कापल्यानंतर त्यापासून खत निर्मिती करण्यासाठी केसकुंड बांधण्यात आला आहे. शेणकुंड बांधून त्यातून मिळणारे खत महापालिकेच्या उद्यानात वापरण्यात येणार आहे. सध्या या शॉवर बाथची आणि पार्लरची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. 


राज्य शासनाच्या नाविण्यपुर्ण योजनेतून 15 लाख रूपये निधी यासाठी आम्ही खर्च केले आहेत. या पार्लरच्या माध्यमातून जलसाठ्यांचे प्रदुषण थांबणार आहे. 
- विजय सुर्यवंशी  

 संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com