कोल्हापूर ः कोरोनाचे केवळ 51 रुग्ण

शिवाजी यादव
Tuesday, 20 October 2020

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत फक्त 51 व्यक्ती कोरोनाबाधित तर 153 जण कोरोनामुक्‍त झाले. 7 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाभरात 1 हजार 959 बाधितांवर उपचार सुरू आहेत. बाधितांची संख्या 47 हजार 478 झाली आहे तर कोरोनामुक्तांची संख्या 43 हजार 912 झाली आहे. आजवरची एकूण मृतांची संख्या एक हजार 607 झाली आहे.

कोल्हापूर ः जिल्ह्यात गेल्या 24 तासांत फक्त 51 व्यक्ती कोरोनाबाधित तर 153 जण कोरोनामुक्‍त झाले. 7 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाभरात 1 हजार 959 बाधितांवर उपचार सुरू आहेत. बाधितांची संख्या 47 हजार 478 झाली आहे तर कोरोनामुक्तांची संख्या 43 हजार 912 झाली आहे. आजवरची एकूण मृतांची संख्या एक हजार 607 झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात बाधितांची संख्या दिवसाला 700 पेक्षा जास्त होती. तेव्हापासून वैद्यकीय यंत्रणेवर ताण होता, तरीही प्रत्येक बाधितांवर सक्षम उपचार करीत बहुतेक रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश आले. गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना मुक्तांची संख्या वाढताना जिल्ह्यातील भीती व ताण कमी होत आहे. जिल्ह्यातील 38 कोवीड सेंटरवर सद्या एकही बाधित नाही. 48 कोवीड सेंटरवर कमीत कमी 2 ते 24 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

हे पण वाचा-  जोतिबा देवाची आजची सोहन कमळ पुष्पातील महापूजा 

सीपीआरमध्ये 96, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये 40 तर डीकेटीई इचलकरंजी येथे 36, चंदगड येथे 19 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. अपवाद वगळता कोवीड सेंटरमध्ये 93 टक्के बेड रिकामे आहेत. 14 शासकीय रुग्णालयात दिवसभरात जवळपास 358 व्यक्तींचे स्वॅब घेतले आहेत. त्यांचा अहवाल लवकरच मिळणार आहे, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kolhapur city and district only 51 corona patient