कोल्हापूर शहर हद्दवाढ प्रस्तावात लोकसंख्या वाढीचा विचारच नाही

 Kolhapur city boundary extension proposal does not consider population growth
Kolhapur city boundary extension proposal does not consider population growth

कोल्हापूर  ः शहराची 2011 च्या जनगनणे नुसार लोकसंख्या 5 लाख 49 हजार 283 होती. लोकसंख्येची घनता 82.20 टक्के होती. तर महापालिकेचे क्षेत्र 6682 (हेक्‍टर) होते. गेल्या नऊ वर्षामध्ये स्वाभाविकपणे लोकसंख्या वाढली. घनताही वाढली पण भूभाग तेवढाच आहे. याशिवाय तरंगती लोकसंख्या (प्लोटिंग पॉप्युलेशन) शहरामध्ये अधिक आहे. याचा ताण महापालिकेवर आहे. यासाठी शहराची हद्दवाढ गरजेची आहे. या मुद्याचा हद्दवाढीच्या प्रस्तावात एकाच ओळीत उल्लेख करण्यात आला आहे. तरंगत्या लोकसंख्येचा प्रस्तावात उल्लेखही नाही. 
महापालिकेने नगरविकास विभागाला हद्दवाढीचा जो प्रस्ताव पाठवला. यामध्ये शहराची वाढती लोकसंख्या व लोकसंख्येची वाढती घनता यांचा नाममात्र उल्लेख आहे. 1871, 1941 या वर्षांची लोकसंख्या दिली आहे. त्यानंतर थेट 2011 च्या जनगणनेनुसार असणाऱ्या लोकसंख्येचा केवळ उल्लेख आहे. शहरामध्ये दिवसभरात येणारे आणि परत जाणाऱ्या लोकांचीसंख्याही काही हजारांत आहे. याला तरंगती लोकसंख्या म्हणतात. याचा उल्लेखही प्रस्तावात नाही. 1951 पासून शहराचे क्षेत्र 6682 हेक्‍टर म्हणजे 16,705 एकर एवढे आहे. 1901 साली शहराची लोकसंख्या 54 हजार 373 होती. 2011 च्या जनगणेनुसार ही लोकसंख्या 5 लाख 49 हजार 283 इतकी झाली आहे. मात्र शहरच्या क्षेत्रामध्ये फारशी वाढ झाली नाही. लोकसंख्येची घनताही वाढत आहे. 1901 साली घनता 60.68 होती. 2011 साली ती 82.20 इतकी आहे. लोकसंख्येच्या घनतेची जाणिव महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेतून येते. सुरुवातीला 71, त्यानंतर 77 आणि आता 81 प्रभाग झाले आहे. यामध्ये लोकसंख्येची सर्वाधिक घनता ही विचारे माळ प्रभागात आहे. ती प्रती हेक्‍टर 1,181 आहे. तर सर्वात कमी घनता शुगरमील प्रभागात 9 इतकी आहे. या सगळ्याचा ताण हा स्वाभाविकपणे महापालिकेच्या यंत्रणेवर येतो. पाणि पुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी या सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी हद्दवाढ हा प्रभावी पर्याय आहे. मात्र महापालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावात याची प्रभावीपणे मांडणी केलेली नाही. 


तरंगत्या लोकसंख्येचा विचार नाही 
शहरात विद्यार्थी, पर्यटक, नोकरदार, व्यावसायिक, प्रवासी यांची वर्दळ नित्याची आहे. नवरात्रीमध्ये रोज लोखो भाविक शहरात येतात. हे लोक शहरातील सर्व व्यवस्थांचा उपभोग घेतात. त्यामुळे महापालिकेवर या सर्व यंत्रणांवर ताण येतो. या तरंगत्या लोकसंख्येची रोजची सरासरी काही हजारांच्या पुढे आहे. याचाही उल्लेख हद्दवाढीच्या प्रस्तावात नाही. 

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com