शासकीय निधी शंभर टक्के खर्च करा ; जिल्हाधिकारी दौलत देसाई 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, आयपास प्रणालीव्दारे 20 जानेवारीपर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव दिले पाहिजेत

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनांमधील मंजूर शंभर टक्के निधी खर्च झाला पाहिजे. तसेच, प्रशासकीय मान्यतेसाठी 20 तारखेपर्यंत प्रस्ताव द्यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, आयपास प्रणालीव्दारे 20 जानेवारीपर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव दिले पाहिजेत. यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी त्यांना मंजूर झालेला निधी वेळेत खर्च झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थिती मंजूर निधी परत जावू नये याची काळजी घेतली पाहिजे. याव्यतिरिक्त मोठ्या योजनेसाठी राज्य शासनाकडे काही निधीची मागणी करायची असेल तर त्याचे सविस्तर प्रस्तावही शनिवारपर्यंत (ता. 23) दिले पाहिजेत. असेही आवाहन श्री देसाई यांनी केले. 

यावेळी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आणि सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, डीआरडीएचे प्रकल्प संचालक रवी शिवदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय.ए.पठाण, संजय सोनवणे, दीपक घाटे, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur collector daulat desai