कोल्हापूर जिल्ह्यात दिवसात नवे 62 बाधित 

0
0
Updated on

कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांत नियंत्रणात असलेली कोरोनाबाधितांची संख्या आज दिवसात अचानक वाढली. जिल्हाभरात गेल्या 24 तासांत 62 नवे बाधित सापडले, तर दोघींचा मृत्यू झाला. दिवसभरात 23 व्यक्ती कोरोनामुक्‍त झाल्या. जिल्ह्यात सक्रिय रुग्ण 374 आहेत. 

गेल्या दीड महिन्यात मुंबई, पुण्यासह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत कोल्हापुरात बाधितांची संख्या स्थिर होती. याचदरम्यान आरोग्य संचालकांनी चाचण्या वाढवा, संपर्कातील व्यक्तींची शोधमोहीम राबवा, असे आदेश दिले होते. त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. शहरातून दिवसाला 500 पर्यंत स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. शहरात दिवसाला 15 ते 40 नवे बाधित सापडत आहेत. तेवढ्याच व्यक्ती कोरोनामुक्तही होत आहेत. 

गेल्या दोन दिवसांत महापालिकास्तरावर स्वॅब संकलनाचा आकडा आणखी वाढला. दिवसभरात 858 हून अधिक स्वॅबचे संकलन झाले आहे. जिल्ह्यातील अन्य शासकीय रुग्णालयांतून 350 स्वॅबचे संकलन झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत बाधितांची संख्या आणखी वाढते की काय, अशी शक्‍यता आहे. दरम्यान, कणकवली तालुक्‍यातील 78 वर्षीय महिला, तसेच कागल तालुक्‍यातील 67 वर्षीय महिला कोरोनाबाधित म्हणून येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांचा मृत्यू झाला. दिवसभरात शहरात 27 बाधित, करवीर तालुक्‍यात 11, इचलकरंजीत 5 तर परजिल्ह्यातील 16 व्यक्ती बाधित आढळल्या. पन्हाळा, शाहूवाडीत प्रत्येकी एक व्यक्ती बाधित आढळली. 

इचलकरंजीत 25 रुग्ण सक्रिय 
इचलकरंजी ः शहरात आज महालक्ष्मी टॉवर (आझाद चित्रमंदिरजवळ) व सरस्वती अपार्टमेंट (जवाहरनगर) या दोन परिसरातील दोन महिला बाधित आढळल्या. नाईट कॉलेज परिसरातून एकाच कुटुंबातील दोघांना संसर्ग झाला आहे. काल तीन रुग्ण सापडले होते. सध्या शहरात सक्रिय रुग्ण 25 आहेत. 

कुर्डूतील दोघे पॉझिटिव्ह 
हळदी ः कुर्डू (ता. करवीर) येथील एकाच कुटुंबातील दोघे बाधित आढळले. संबंधित व्यक्ती ट्रॅक्‍टर खरेदीसाठी जिल्ह्याबाहेर गेली होती. तिकडून आल्यानंतर ते आजारी पडल्याने त्यांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले. त्यानंतर दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या दोघेही कोडोलीतील खासगी दवाखान्यात दाखल आहेत. कुटुंबीयांना क्वारंटाईन केल्याची माहिती इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राने दिली. 

आजरा तालुक्‍यात शिरकाव 
आजरा ः तालुक्‍यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. तालुक्‍यात चार बाधित सापडले. चर्च गल्लीमधील महिला, तर हारुर, गवसे व सोहाळे गावातील तीन ज्येष्ठ नागरिक बाधित झाले आहेत. 

आठ क्‍लासेस, दोन दुकानदारांना दंड 
महापालिकेच्या भरारी पथकाने मास्क व सॅनिटायझर न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे, यामुळे आठ खासगी क्‍लासेसवर व दोन दुकानांकडून प्रत्येकी हजार रुपये दंड वसूल केला. 
शाहूपुरी येथील दोन दुकाने एक तासासाठी बंद करून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसुल केला. शाहू मैदान, शिवाजी पेठ, टाकाळा, महाद्वार रोड, बेलबाग, निवृत्ती चौक, फिरंगाई आदी भागांतील आठ खासगी शिकवण्यांवरही कारवाई झाली. अतिक्रमण पथकप्रमुख पंडित पोवार, बाजार निरीक्षक राजेंद्र पाटील, सज्जन नागलोत, रवींद्र कांबळे आदींनी कारवाई केली.

         जिल्ह्याचे चित्र

  • एकूण कोरोना बाधित : 50 हजार 063 
  • कोरोनामुक्त : 48 हजार 935 
  • कोरोनाने मृत्यू : 1 हजार 54 
  • उपचार घेणारे : 374 


संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com