कोल्हापूर जिल्ह्यात फुटबॉलचे 32, कुस्तीचे 25 राष्ट्रीय पंच... 

 Kolhapur district has 32 national football umpires and 25 wrestling national umpires.
Kolhapur district has 32 national football umpires and 25 wrestling national umpires.

कोल्हापूर : जिल्ह्यात सहा क्रीडा प्रकारांत 67 राष्ट्रीय पंच असल्याची माहिती पुढे आली आहे. फुटबॉलचे सर्वाधिक 32, तर कुस्तीचे 25 असून अन्य क्रीडा प्रकारांत हॉकी, कराटे, तलवारबाजी व कबड्डीचा समावेश आहे. भारतीय शालेय खेळ महासंघाने प्रत्येक ऑलिंपिक गेम्ससाठी पंचांची यादी मागविल्यानंतर जिल्ह्यातील ही स्थिती दिसून आली आहे.

उर्वरित क्रीडा प्रकारांचे काय, असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे. शालेय स्तरावरील एकूण 49 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होतात. प्रत्येक खेळात जिल्ह्यातील खेळाडू, पंच व क्रीडा संघटक यांचा समावेश असतो. ते जिल्हा क्रीडा कार्यालयाशी सहकार्य करत स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याचे काम करतात. मात्र, त्यांची नेमकी संख्या किती, याची माहिती एकत्रित केली नव्हती. भारतीय शालेय खेळ महासंघाने प्रत्येक ऑलिम्पिक गेम्ससाठी पंचांची नावे पाठविण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाला आवाहन केल्यानंतर, ही माहिती एकत्रित झाली. 10 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रीय पंचानी क्रीडा कार्यालयाला माहिती द्यावी, असे कळविले होते. फुटबॉल व कुस्तीनंतर तलवारबाजी पाच, कराटे व हॉकी प्रत्येकी दोन व कबड्डीत एक राष्ट्रीय पंच असल्याची नोंद क्रीडा कार्यालयाकडे झाली आहे. उर्वरित क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय पंच आहेत की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 
यापूर्वी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत स्नेहल बेंडके, हॉकीमध्ये रमा पोतनीस व श्वेता पाटील आहेत. श्वेता इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे कार्ड मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली हॉकी खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात शालेय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेतील आकड्याएवढे खेळ खेळले जात असले तरी राष्ट्रीय पंचांची नोंद कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 


राष्ट्रीय पंचांनी जिल्हा क्रीडा कार्यालयात माहिती पाठवावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार दहा फेब्रुवारीपर्यंत 67 पंचांची माहिती जमा झाली. उर्वरित खेळांत राष्ट्रीय पंच आहेत की नाही, हे सांगता येत नाही. असतील तर त्यांनी माहिती पाठविणे आवश्‍यक आहे. 
- सुधाकर जमादार, क्रीडाधिकारी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com