कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली २५ हजारांवर

०
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री बारा ते गुरुवारी रात्री बारापर्यंत एक हजार 375 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. याच कालावधीत एक हजार 908 व्यक्ती बाधित आढळल्या. दोन दिवसांत एकूण 62 जणांचा मृत्यू झाला. आजअखेर एकूण 14 हजार 347 कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण बाधितांची संख्या 25 हजारांपुढे गेली आहे. दोन दिवसांत आजवरचे सर्वाधिक बाधित आढळल्याने कोरोनाची भीती आणखी ठळक झाली. 

आठ हजारांवर अधिक बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 160 जणांची प्रकृती गंभीर आहे. दिवसभरात आणखी एक हजार 626 व्यक्तींचे नवीन स्वॅब घेतल्याने दोन दिवसांत बाधितांची संख्या वाढण्याची भीती आहे. दोन दिवसांत बाधितांचे प्रमाण वाढले. अशात शासकीय रुग्णालयात खाटांचा प्रश्‍न आहे. यातही सौम्य लक्षणे असलेल्यांना कोविड सेंटरमध्ये उपचार होत आहे. प्रकृती अधिक गंभीर आहे आणि व्हेंटिलेटरची गरज आहे, अशांना ती व्यवस्था उपलब्ध नाही. शासनाने माहिती केंद्र सुरू केले तरी बहुतेक वेळा एखाद्या खासगी रुग्णालयात संपर्क साधण्यास सांगण्यात येते. तेथेही खाट उपलब्ध होतात असे नाही. अनेकदा बिल परवडणारे नसल्याने सामान्य रुग्णांना ससेहोलपट सोसावी लागत आहे. 

तालुकानिहाय दोन दिवसांतील बाधित असे : कोल्हापूर शहर 627, इचलकरंजी 273, शिरोळ 170, करवीर 159, हातकणंगले 179, अन्य राज्य 98 , कागल 52, पन्हाळा 19 , चंदगड 28 , शाहूवाडी 16, अन्य तालुक्‍यात 3 ते 15 बाधित. 

        जिल्हा दृष्टीक्षेपात

  • एकूण कोरोनाग्रस्त --- 25 हजार 614 
  • एकूण कोरोनामुक्त--- 16 हजार 424 
  • एकूण मृत्यू -------------------785 
  • सध्या उपचार घेणारे------8 हजार 405 

        दोन दिवसांतील सविस्तर आकडेवारी

  • सोमवारी रात्री बारा ते मंगळवारी रात्री बारा : 876 नवे बाधित, 784 कोरोनामुक्त आणि 35 मृत्यू 
  • मंगळवारी रात्री बारा ते गुरुवारी रात्री बारा : 10 हजार 32 नवे बाधित, तर 591 कोरोनामुक्त आणि 27 मृत्यू  

संपादन  : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com