कोल्हापूर जिल्ह्याला 'या' कामांसाठी मिळणार ३३१ कोटीचा निधी...

कोल्हापूर जिल्ह्याला 'या' कामांसाठी मिळणार ३३१ कोटीचा निधी...

कोल्हापूर - करवीर निवासनी श्री अंबाबाई देवी मंदिर विकासासाठी राज्य शासनाच्या योजनेतून जास्तीत जास्त निधी दिला जाईल. 

अजित पवार यांची बैठकीत मान्यता

कोल्हापूर महानगरपालिकेकडून जागा घेऊन दोन हजार आसन क्षमतेच्या सांस्कृतीक सभागृहाला पाच कोटी रुपयांचा निधी आणि जिल्हयाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी (२०२०-२१) ३३१ कोटी ५२ लाख रुपयांच्या प्रारूप आराखडयास मान्यता दिली, असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज दिली. कोल्हापूर जिल्हा विकास नियोजन आराखड्याबाबत आज पुणे विधानभवन येथे बैठक झाली, या वेळी ते बोलत होते.  

पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा विकास निधीत भरीव वाढ करुन देण्याची मागणी केली. श्री. अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी तसेच राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या शाहू मिलमध्ये स्मारक करण्यासाठी लागणारा जास्ती निधी देऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्यास पाठबळ द्यावे, अशी मागणीही श्री पाटील यांनी केली.

दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेकडून जागा घेऊन २ हजार आसन क्षमता असणाऱ्या सांस्कृतिक सभागृह तयार करण्यासाठी ५ कोटींच्या निधीही यावेळी, जाहीर केला. आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीच्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयास १६ कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी करत जिल्ह्यात आलेल्या पुरग्रस्तांना जाहीर झालेला निधी तत्काळ शेतकरी, व्यावसायिक व इचलकरंजीसह अन्य उद्योजकांना मिळाला पाहिजे. यासाठी शासनाने याकडे लक्ष द्यावे, मदत निधी जाहीर झाला आहे. पण तो शेवटच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. दरम्यान, उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी इंदिरा गांधी रूग्णालयास दोन टप्प्यात निधी देऊ, अशी ग्वाही दिली. या वेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीबाधित भागातील सार्वजनिक कामांचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करावा. जेणेकरुन त्यासाठी स्वतंत्र निधी पुरविता येईल. बसस्थानके, पोलिस ठाणे आणि अंगणवाड्यांची इमारतींची विकासकामे ‘सीएसआर’ निधीतून करावीत. आदिवासी भागातील आश्रमशाळांसाठी मध्यवर्ती किचन सुरू करावे,’’ अशा सूचना पवार यांनी केल्या.

रंकाळा, थेट पाईपला चालना

रंकाळा आणि कळंबा तलावाच्या विकासालाही राज्याच्या अर्थसंकल्पात निश्‍चितपणे तरतूद केली जाईल. तसेच, कोल्हापूर शहराच्या थेट पाईपलाईन योजनेला गती देण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता केली जाईल. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या पातळीवरही हे प्रश्‍न निकाली काढण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार 
यांनी केल्या.

या कामासाठी निधी

  •  अंबाबाई देवी मंदिराच्या विकासासाठी राज्य योजनेतून भरीव निधी देणार
  •  इचलकरंजीच्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयास दोन टप्प्यांत निधी
  •  राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या शाहू मिलमध्ये स्मारकाची मागणी
  •  रंकाळा आणि कळंबा तलावाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद 
  •  कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन योजनेला गती देण्याची सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com