मंत्री मुश्रीफांनी "शब्द' पाळला 

minister hasan mushrif fund provided for kolhapur zp members
minister hasan mushrif fund provided for kolhapur zp members

कोल्हापूर - जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीदरम्यान सदस्यांवर निधीची खैरात करण्याचा शब्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता. मंत्री मुश्रीफ यांनी दिलेला शब्द सत्यात उतरत आहे. सत्ताधारी गटाच्या 40 सदस्यांकडून प्रत्येकी 25 लाखांचे प्रस्ताव जमा करण्यात येत आहेत. मार्चपूर्वी 40 सदस्यांना निधी दिला जाणार आहे. मंत्ती मुश्रीफ यांनी दिलेला शब्द पाळल्याबददल सदस्यांमधून समाधान व्यक्‍त होत आहे. 

जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यात महाविकास आघाडीने यश मिळवले. यामध्ये मुश्रीफ, पालकमंत्री पाटील, शिवसेना खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 
विषय समिती सभापती निवडीतही अनेक अडथळ होते; मात्र सदस्यांनी पदाच्या मागे न लागता मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे घ्यावीत, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत व्यासपीठावर येतानाच मंत्री मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यांना विकास कामासाठी 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली. दरम्यानच्या काळात सभापती निवडी पूर्ण होऊन सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले. 
दरम्यानच्या काळात विषय समिती सभापती निवडी होऊन नियमित कामकाजाला सुरुवात झाली. सदस्यांनाही मंत्री मुश्रीफांच्या घोषणेचा विसर पडला होता; मात्र अचानकच शुक्रवारी महाविकास आघाडीच्या सदस्यांना 2515 या हेडखाली 25 लाखांची विकासकामे तात्काळ सुचवण्याचे सांगण्यात आले. अचानक आलेल्या निरोपाने सदस्यही अवाक झाले. तीन वर्षांत पहिल्यांदाच एकत्रितरित्या मोठी रक्‍कम विकासकामांना मिळणार आहे. मार्चपूर्वी 25 लाख व मार्चनंतर 25 लाख रुपये दिले जाणार आहेत. 

जिल्हा परिषदेत लगबग 
सत्ताधारी गटाच्या सदस्यांना निधी मिळणार असल्याने पत्र देणे, कामाचे अंदाजपत्रक तयार करणे यासाठी जिल्हा परिषदेत गडबड सुरू झाली आहे. काही सदस्यांनी एक, दोन तर काही सदस्यांना या निधीतून चार ते पाच कामे सुचवली आहेत. गटर्स पासून गावातील व पाणंद रस्तेही यामध्ये सुचवण्यात येत आहेत. हा निधी महाविकास आघाडीच्या सदस्यांना दिला जाणार असला तरी त्यातून तीन सदस्य वगळले आहेत. याची नावे मात्र अजून स्पष्ट झालेली नाहीत. 

पदाधिकारी निवडीवेळीच मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदस्यांना भरघोस निधी देण्याची घोषणा केली होती. सत्ताधारी गटाच्या 40 सदस्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची कामे सुचवण्यास सांगण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कामाबाबत सूचना दिल्या आहेत. मंत्री मुश्रीफ हे शब्द पाळणारा नेते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. 

सतीश पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com