गाळपात पुणे, उताऱ्यात कोल्हापूर विभाग ठरला भारी

सुनील पाटील  
Wednesday, 2 December 2020

साखर कारखान्यांकडून उसाला अपेक्षीत दर दिला जात नाही

कोल्हापूर : कोरोना संसर्गामूळे राज्यात ऊस दरासाठी आंदोलन, मोर्चे, रास्ता रोको फारसे झाले नाहीत. साखर कारखान्यांनीही एफआरपीची एक रक्कमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत जमा करत आहे. त्यामुळे, गेल्या पंधरा ते वीस वर्षाच्या तुलनेत यावर्षी राज्यात साखर हंगामा जोमाने सुरु झाला आहे. 5 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात 181 लाख 74 हजार टन उसाचे गाळप झाले आहे. तर, 175 लाख 17 हजार क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. ऊस गाळपामध्ये पुणे विभाग तर साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. 

राज्यातील प्रत्येक ऊस हंगाम हा ऊस दर आंदोलनामुळे चर्चेत येत असतो. साखर कारखान्यांकडून उसाला अपेक्षीत दर दिला जात नाही. त्यामुळे अशा आंदोलनाचा दणकाही महत्वाचा आहे, यात शंका नाही. राज्यात यंदाचा गळीत हंगाम वेळेत सुरु झाला आहे. याचा निश्‍चितपणे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 
राज्यात कोल्हापूर विभागात सहकारी आणि खासगी 33 कारखाने आहेत. तर पुणे विभागात 26, सोलापूर विभागात 33, अहमदनगर 25, औरंगाबाद 20, नांदेड 19, अमरावती 2 साखर कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांमधून प्रतिदिन 6 लाख 10 हजार 280 मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याची क्षमता आहे. सध्या पुणे 5 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात पुणे विभागात 43 लाख 58 हजार टन उसाचे गाळप झाले आहे. तर, 40 लाख 91 हजार क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. तर, कोल्हापूर विभागात 37 लाख 67 हजार टन उसाचे गाळप तर 37 लाख 62 हजार क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. यामध्ये कोल्हापूरचा साखर उतारा 9.99 टक्के आणि पुणे विभागाचा 9.39 टक्के साखर उतारा आहे. नांदेड विभागाचा सर्वात कमी 7.6 टेक्‍क उतारा आहे. 

हे पण वाचाजा बाबा! तुझ्या पाया पडतो! माजी सरपंचानी केली विनवणी  

राज्यातील गळीत हंगाम, साखर उत्पादनाच चित्र
साखर कारखाने (विभागानूसार) * ऊस गाळप (लाख मेट्रिक टन) * सारख उत्पादन (लाख क्विंटल)* साखर उतारा टक्केवारी 
कोल्हापूर* 37.67* 37.62* 9.99 
पुणे* 43.58* 40.91* 9.39 
सोलापूर* 38.68* 30.98* 8.01 
अहमदनगर* 30.74* 24.58* 8 
औरंगाबाद* 17.42* 12.73* 7.31 
नांदेड* 12.14* 9.23* 7.6 
अमरावती* 1.51* 1.12* 7.42 
नागपूर* 0* 0* 0 
एकूण* 181.74* 157.17* 8.65 

 संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur division tops in sugar extraction