Breaking : कोल्हापूरला जुलैअखेर मिळणार रिमोट कंट्रोलवरील "यु' बोटी

Kolhapur by the end of July "U 'boat
Kolhapur by the end of July "U 'boat

कोल्हापूर : महापुराच्या कालावधीत तीनशे मीटर दूर पाण्यात जाण्यासाठी रिमोट कंट्रोलवरील "यू' बोटी उपलब्ध करून दिल्या जातीत. याची निविदा लवकरच प्रसिद्ध करून महिनाअखेरीस त्या उपलब्ध होतील, अशी व्यवस्था केली आहे. वीज पडून नुकसान होणार नाही यासाठी प्रतिबंध यंत्रणा बसविली जाईल.

ड्रोनच्या सहाय्याने पंचनामे होतील काय याचाही विचार सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच कोरोना महामारीतील पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर विभागांचे काम अभिनंदनीय आहे. आरोग्य सेवेसाठी आतापर्यंत 3 कोटी 15 लाख रुपये दिले आहेत, व्हेंटिलेटरसह इतर आरोग्य साधनांसाठी आणखी पाच कोटी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

मंत्री वडेट्टीवार आज जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी सकाळी सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी महापूर आणि कोरोना विषाणुबाबतचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेवून सविस्तर माहिती दिली. गतवर्षी महापुराने कोल्हापूर जिल्ह्यात झालेले नुकसान आणि यावर्षी केलेल्या उपाय योजना याबाबत त्यांनी सांगितले, की एनडीआरएफच्या तीन टीम ज्या प्रत्येक टीम मध्ये 25 जवान असतील. गरज पडल्यास त्यांचा वापर नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी होईल, तसेच रिमोट कंट्रोलवरील "यु' बोटी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जीव धोक्‍यात घालण्याची गरज पडणार नाही.

सध्या एकूण75 मोटार बोटींचे नियोजन झाले आहे. या व्यतिरिक्त यु बोटी असतील. गतवर्षी झालेल्या नुकसानीसाठी अद्याप 41 कोटींची गरज आहे. तो प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला आहे. त्याला आत्ताच नाही पण टप्प्याटप्प्याने मंजुरी मिळेल. जिल्ह्यात आकाशातून वीज पडून नुकसान होणार नाही, यासाठी वीज प्रतिबंधक यंत्र बसविण्याचे नियोजन आहे. महापुरात पाण्याचे नियोजन होण्यासाठी धरणांतील पाण्याचेही नियोजन केले आहे. कृषी पंपाच्या नुकसान होणार नाही याचेही नियोजन सुरू आहे. 

प्रशासनाकडून चांगले काम... 
कोरोना विषाणुबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने चांगले काम केले आहे. राज्यात सर्वात कमी मृत्यूदर आणि सर्वात अधिक रिकव्हरी येथे झाली आहे. त्यामुळे आरोग्यासह इतर कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव केला जावा असेही मी सुचविले आहे. 

माझ्या वाक्‍याचा विपर्यास... 
कोरोना योद्धांच्या पगारात कोणतीही कपात होणार नाही. त्यांचे पगार प्राधान्याने दिले जातील. इतर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचेही पगार टप्प्याटप्प्याने होतील. इतरांचे पगार होणार नाहीत असे मी म्हणालो नाही. माझ्या वाक्‍याचा विपर्यास केला आहे, असाही खुलासा मंत्री वडेट्टीवार यांनी आज येथे केला. काल त्यांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा मांडला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com