esakal | उत्पादक हवालदिल; गुळाच्या दरात घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur Falling jaggery prices

रोज या ना त्या कारणाने सौदे बंदचा फटका

उत्पादक हवालदिल; गुळाच्या दरात घसरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : माथाडी कामगारांच्या मागणीसाठी गूळ सौदे बंद, व्यापाऱ्यांच्या मागण्या असल्या की अचानक सौदे बंद या ना अनेक कारणांमुळे सौदे बंद करून गूळ उत्पादकांना नाहक त्रास देण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. यातच आता गूळ दरात दिवसेंदिवस घसरण होते. याचाही दुसरा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.


कोल्हापूरमधील शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम निसर्गाच्या प्रकोपासह मानवनिमिर्ती संकट सामना करत पार पाडावा लागत आहे. यातही गुळ उत्पादक शेतकऱ्यांसाठीच हंगाम माथाडी कामगारांच्या सौदे बंदने सुरू झाला. पहाटेपासून ज्या शेतकऱ्यांनी आपला गूळ व्यापाऱ्यांकडे थप्पीला लावला त्यांना या सर्वाचा मानसिक त्रास सहन करावा लागला. सौदे सुरळीत सुरू होतात न होतात तोवर आता प्रतिक्विंटल गूळ दरामध्ये घसरण सुरू झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला प्रतिक्विंटल ४५०० ते ५००० रुपयांपर्यंत गुळाचा दर जाहीर केला होता.

हेही वाचा- सात वर्षांनंतर आई-मुलाची  माऊली कृपेने झाली भेट

सध्या, या दरात प्रतिक्विंटल साडेतीनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाली आहे. सध्या बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटलचा दर ३५०० ते ३८०० पर्यंत जाहीर होता. यापैकी सर्वाधिक कमी असणारा म्हणजेच २९०० ते ३००० रुपयेचे शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत. एवढ्या कमी दरात एक गुंठे उसासाठी केलेला खर्च निघत नाही. त्यामुळे यंदाचा गूळ हंगाम शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करायला लावणारा आहे. सणाच्या मुहुर्तावर गुळाला ५००० रुपयांपर्यंत निघणारा गुळाचा दर इतर वेळी मात्र २८०० ते २९०० रुपयांने प्रतिक्विंटल काढला जात आहे.

दृष्टिक्षेपात हंगाम
  सुरवातीला दर    ४५०० ते ५००० रुपयांपर्यंत 
  सध्या प्रतिक्विंटल     ३०० रुपयांची घसरण 
  शेतकऱ्यांच्या हातात     २९०० ते ३००० रुपये 
  मुहूर्तावरील दर     २९०० रुपयांपर्यंत

गुळाला प्रतिक्विंटल किमान चार हजार रुपये दर मिळाला तरच शेतकऱ्यांना गूळ व्यवसाय परवडतो. २९०० ते ३००० रुपये दर शेतकऱ्यांना आतबट्ट्यात आणणारा आहे. मुहूर्ताचा गूळ दराचा मोठा आकडा हा दिखावा केला जातो. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खूप कमी दर मिळत आहे. 
- दत्तात्रय पाटील, गूळ उत्पादक

संपादन- अर्चना बनगे

go to top