जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक : पीक कर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम 

सुनील पाटील
Friday, 18 September 2020

इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम स्थानावर बाजी मारली आहे.

कोल्हापूर : पीककर्ज वाटपामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यासाठी पीक कर्जाचे 2 हजार 480 वार्षिक उद्दिष्ट्ये असून 31 ऑगस्ट अखेर 1 हजार 892 कोटी कर्ज वाटप केले आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम स्थानावर बाजी मारली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठक़ीत जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सर्व राष्ट्रियकृत, ग्रामीण, खासगी, सहकारी बॅंक आणि यंत्रणेचे अभिनंदन केले. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा स्वत:हून दुप्पट उद्दिष्ट घेऊन यापुढे सर्वांनी कामकाज करावे आणि जिल्ह्याचे मानांकन नेहमीच प्रथम स्थानी ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली.

 

जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीच्या ऑनलाईन बैठक घेतली. जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्ह्यात सध्या प्रलंबित असणाऱ्या कामकाचे नियोजन करावे. त्यादृष्टीने आराखडा पाठवावा. सहा महिन्यात यावर काम व्हायला झाले पाहिजे. बीएलबीसीच्या बैठकीत आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रीत करावे आणि बॅंकांनी विविध योजनांच्या कर्ज वाटपाची यादी पाठवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. बॅंकेत येणाऱ्या ग्राहकांना सेवा देत आहोत. ही आस्था ठेवून ग्राहकांना चांगली वागणूक देवून सुसंवाद ठेवावा. याविषयी क्षेत्रीय स्तरावर प्रबोधन करण्यात यावे. राष्ट्रिय बॅंकांविषयी तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केली. 

हेही वाचा- पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्‍वास : चर्चा रंगली अर्भकाची अन् -

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, बीएलबीसीमध्ये स्थानिक लोकप्रतिनीधींना निमंत्रीत करावे. ग्राहकांना राष्ट्रिय बॅंकांनी सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी. शासनाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ गरजूंना देवून नवे उद्योजक तयार करावेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, सर्व बॅंकांनी तालुकानिहाय उद्दिष्टांची पूर्तता करून अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा. याचा आढावा मुख्यालयाने आठवड्याला घ्यावा. ज्या बॅंकांचा सीडी रेशो 60 टक्‍क्‍याच्या खाली आहे त्यांनी हा रेशो 60 टक्‍क्‍याचा वर जाण्यासाठी काय नियोजन केले आहे, याबाबतचा खुलासा 15 दिवसात द्यावा. 

हेही वाचा- कारखान्यांची होणार कसरत : ट्रक-ट्रॅक्‍टर, बैलगाड्या मिळणे अवघड -

अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहूल माने म्हणाले, 30 जून 2020 पर्यंत पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत 10 लाख 78 हजार 33 खाती उघडण्यात आली आहेत. 7 लाख 72 हजार 136 खात्यामध्ये रूपे कार्ड वाटप केली आहेत. प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेतंर्गत 4 लाख 74 हजार 700 खाती सुरु केली आहेत. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेतंर्गत 1 लाख 84 हजार 308 खाती उघडण्यात आली आहेत. अटल विमा योजनेतंर्गत 58 हजार 347 खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत जून 2020 अखेर 7 हजार 842 लोकांना 113.129 कोटीचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यावेळी, भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे सहाय्यक महाप्रबंधक मनोज मून, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक यांच्यासह सर्व बॅंकांचे जिल्हा समन्वयक, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सहभागी झाले होते. 
 

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur first in the state in allocating crop loans Collector Daulat Desai Appreciation of banks by the Collector