esakal | कोल्हापूर कन्या नंदिनीची जागतिक कुस्तीसाठी निवड 

बोलून बातमी शोधा

Kolhapur girl Nandini selected for world wrestling}

रोम (इटली) येथे होणाऱ्या रॅंकिग सेरीज जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी ती रवाना झाली

कोल्हापूर कन्या नंदिनीची जागतिक कुस्तीसाठी निवड 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुरगूड : येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती (साई) संकुल व डार्फ केटल ग्रुप मुंबईची दत्तक कुस्तीगीर नंदिनी बाजीराव साळोखेची (53 किलो वजन गट) जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. 
रोम (इटली) येथे होणाऱ्या रॅंकिग सेरीज जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी ती रवाना झाली. 

आग्रा येथे झालेल्या 23 व्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत नंदिनीने 53 किलो वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत आंतरराष्ट्रीय कुस्ती पदक विजेत्या मल्लांना हरवत महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. प्रशिक्षक दादासाहेब लवटे, सुखदेव येरूडकर, दयानंद खतकर, सागर देसाई, दर्शन वाघ, संतोष जगदाणे, संजय दुधाणे यांचे मार्गदर्शन, तर खासदार संजय मंडलिक, ऍड. वीरेंद्र मंडलिक, चंद्रकांत चव्हाण, आण्णासो थोरवत, पांडुरंग भाट, नामदेव मेंडके, डॉ. प्रशांत अथणी, आई सरिता साळोखे यांचे प्रोत्साहन लाभले. 


   संपादन - धनाजी सुर्वे