कोल्हापुरच्या कन्येची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

यशाचे नवे शिखर गाठत आपल्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली.

कोल्हापूर : शांतिनिकेतन स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अनुप्रिया अमितकुमार गावडे या विद्यार्थीनीने यशाचे नवे शिखर गाठत आपल्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली.

8 वर्ष 8 महिन्याच्या अनुप्रियाने भारतीय घटनेतील प्रस्तावना, भाग 1, 2 व 3 मधील 35 कलमे व उपकलमे 6 मिनीट 10 सेकंदात पठण केल्यामुळे तिच्या नावाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली व तिला ग्रँड मास्टर हा किताब बहाल करण्यात आला आहे. कोल्हापूरसह संपूर्ण देशाचे नाव एशिया खंडामध्ये कोरले गेले आहे.

वक्तृत्वात आवड असलेल्या अनुप्रियाने अनेक बक्षीस मिळवित शाळेचा बेस्ट स्पीकरचा बहुमानही यापूर्वी पटकाविला होता.अनुप्रीयाने गणित ऑलिम्पियाड परीक्षेत जगात आठवा क्रमांक, आय क्यु ऑलिम्पियाड परीक्षेत देशात दहावा तर ब्रेनडेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत देशात 17 वा क्रमांक पटकावित कोल्हापूरचे नाव उज्वल केले होते.

हे पण वाचामोठी बातमी; भारतातील पहिला शस्त्रक्रिया प्रयोग कोल्हापुरात ; समुद्री कासवाला बसविले कृत्रिम पाय 

चाटर्ड अकौंटंट अमितकुमार गावडे व प्रा. डॉ.अक्षता गावडे यांची ती कन्या आहे. तिला शांतिनिकेतन शाळेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, डायरेक्टर सौ. राजश्री काकडे, प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur girl recorded in Asia Book of Records with India Book of Records