
इचलकरंजी - येथील निधी दिनेशकुमार ललवानी सीए फाउंडेशन परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. निधीने मिळविलेल्या या उत्तुंग यशांने तिचे कुटुंब अक्षरशः भारावून गेले. आपली मुलगी या परिक्षेत नक्की यशस्वी होईल, अशा आत्मविश्वास तिच्या कुुटुंबियांना होता, पण देशात अव्वल आल्याचे समजताच तिच्या कुटुंबियांच्या आनंदाला सिमाच राहिल्या नाहीत.
दरम्यान, कठोर परिश्रम करुन सीएच्या पुढील टप्प्यातील परिक्षेतही टॉपमध्येच यशस्वी होवू, असा आत्मविश्वास निधी हिने "सकाळ"शी बोलतांना व्यक्त केला.
निधीने मिळविलेल्या यशाचा तिच्या कुटुंबांने आनंदसोहळा साजरा केला. निकाला जाहीर झाल्यानंतर निधीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निधीचा मोठा भाऊ अक्षय हा यापूर्वीच सीए उत्तिर्ण झाला आहे. आता निधीनेही सीएच्या पहिल्या टप्प्यातील परिक्षेत लख्ख यश मिळविले आहे. तिच्या या यशाच्या आनंदोत्सवात संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते.
निधीचे वडील कापड व्यापारी आहेत. आई गृहीणी आहे. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच तीने सीए होण्याचे मनात पक्के ठरविले होते. बारावी वाणिज्य शाखेतून चांगल्या गुणांनी ती उत्तिर्ण झाली. त्यानंतर तिने सीए फौंडेशन परिक्षेची तयारी सुरु केली. या परिक्षेत चांगले यश मिळण्यासाठी तिने तीन महिने सेल्फ स्टडी केला. शिक्षकांचेही मार्गदर्शन मिळाले. त्यांनी केलेल्या महत्वाच्या सूचनांनुसार अभ्यास केला. तिचा भाऊ अक्षय हा 2018 मध्ये सीएची परीक्षा उत्तिर्ण झाला आहे. तिला भाऊ अक्षय याचे याबाबत मोठे मार्गदर्शन मिळाले.
या परिक्षेत तिने देशात अव्वल स्थान मिळाल्याचे समजतात कुटुंबियांनी एक वेगळ्या प्रकारची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला. भाऊ अक्षय हा डीकेटीईचा विद्यार्थी आहे. तर निधी हिनेही अगदी प्राथमिक शिक्षणाची सुरुवात डीकेटीईमधूनच केली. या यशानंतर तिच्या मार्गदर्शक शिक्षकांनाही मोठा आनंद झाला. मुलीने मिळविलेल्या यशांने आम्ही भारावून गेल्याचे वडील दिनेशकुमार व आई विमला यांनी सांगितले.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.