
वाढत्या वयानुसार व्यक्तीच्या शरीरामध्ये अनेक व्याधी उत्पन्न होण्यास सुरवात होते. यामध्ये दृष्टीमध्ये फरक लवकरच जाणवण्यास सुरुवात होते.
कोल्हापूर: वाढत्या वयानुसार व्यक्तीच्या शरीरामध्ये अनेक व्याधी उत्पन्न होण्यास सुरवात होते. यामध्ये दृष्टीमध्ये फरक लवकरच जाणवण्यास सुरुवात होते. आणि लवकरच चष्मा लागतो. यामध्ये अगदी लहानमुलांचा देखील समावेश आहे. चष्मा का लागतो यावर संशोधकांनी अनेक वेळा सांगितले आहे.पण चष्मा वापरण्याची वेळच येऊ नये किंवा त्याची क्षमता कमी करून दृष्टी सक्षम करण्याचे संशोधन कोल्हापुरातील एका युवकाने केले आहे. नेमके काय आहे संशोधन घ्या जाणून.
तुर्की देशातील कोच विद्यापीठातील संशोधनात निगवे खालसा (करवीर) येथील डॉ. शरदराव आनंदराव व्हनाळकर यांचा मोलाचा वाटा आहे.डॉ. व्हनाळकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण गोखले कॉलेजमध्ये झाले. शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात एमएस्सी पूर्ण केल्यानंतर ‘कॉन्टम डॉट सेन्सटाईज्ड सोलर सेल’ या विषयात पीएच.डी. मिळवली. प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले.डॉ. व्हनाळकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण गोखले कॉलेजमध्ये झाले. शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात एमएस्सी पूर्ण केल्यानंतर ‘कॉन्टम डॉट सेन्सटाईज्ड सोलर सेल’ या विषयात पीएच.डी. मिळवली. प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले.
हेही वाचा- ग्रामस्थ योजना यशस्वी करतात तर तुमच्या का होत नाहीत? असा सवाल केला
असे आहे संशोधन
प्रकाशाचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करून ती ऊर्जा मेंदूकडे पाठविण्याचे काम डोळ्यांतील रेटिनल मज्जातंतुकडून केले जाते. डोळ्यांच्या दृिष्टपटलातील हा रेटिना कुमकुवत होऊन त्याचा दृष्टीवर परिणाम होतो. यावर पर्याय शोधत सोलर सेलचा मानवी डोळ्यांत वापर करून दृष्टी सक्षम करण्याचे संशोधन आहे.
यामध्ये वापरल्या जाणाऱ्या लिक्विड मटेरियलमुळे ऊर्जानिर्मितीच्या प्रक्रियेत काही समस्या निर्माण होतात. त्याचवेळी घन पदार्थांपासून जर सौरघट तयार करताना सीझेडटीएस धातू व अधांतूचे मिश्रण वापरल्यास ही प्रक्रिया सोपी होते, हे सिद्ध केले.
व्हनाळकरांना युजीसीची रमण फेलोशिप मिळाली. या फेलोशिपमध्ये त्यांना अमेरिकेत संशोधन करण्याची संधी मिळाली. तेथील आयवा स्टेट युनिव्हर्सिटीमध्येही त्यांनी काही काळ ‘परस्काईट सोलर सेल’ वर संशोधन केले. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना तुर्की सरकराकडून टुबी टॅक फेलोशिप मिळाली. याच्या माध्यमातून त्यांनी सोलर सेलचा मानवी डोळ्यांतील वापर या विषयातून संशोधन करत आहेत. प्रा. सेदात नेजामाबिलू यांच्यासोबत हे संशोधन सुरू आहे. सध्या ते गारगोटीतील कर्मवीर हिरे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
संपादन- अर्चना बनगे