व्हॉटस्‌ ऍपवरील "ब्रॉडकास्टींग ग्रुप'द्वारे होते अशी मदत

kolhapur karveer panchayat samiti help for more people
kolhapur karveer panchayat samiti help for more people

कोल्हापूर - माणुसकीचे समाजभान कसे असावे, हे करवीर पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. केवळ व्हॉटस्‌ ऍपवरील "ब्रॉडकास्टींग ग्रुप'द्वारे त्यांनी अनेकांना मदत मिळून दिली आहे. या ग्रुपमध्ये सुमारे दीडशे व्यक्ती आहेत. प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, डॉक्‍टर, शिक्षक, शेतकरी यांचाही ही समावेश आहे. वर्षाभरात त्यांनी दहा कुटुंबियांना आर्थिक हातभार देऊन जगण्याची उम्मेद दिली आहे. प्रसिद्धीच्या झोतात न येता काम करून माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या या अवलीयांचे "समाजभान' नक्कीच पथदर्शी आहे. 

करवीर पंचायत समिती मध्ये विश्‍वास सुतार हे शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत ते राधानगरी तालुक्‍यातील दुर्गम असलेल्या खामकरवाडीत ड्युटीवर होते. मतदानादिवशी एका सदतीस वर्षीय मुलीला तिचा भाऊ कंबरेवरून घेवून मतदानासाठी आला. आजपर्यंत एकदाही तिने मतदान चुकविले नसल्याचे सुतार यांना समजले. त्यांनी त्या मुलीला "व्हीलचेअर' आणि "व्हील कमोड' देण्याचे वचन दिले. आणि स्वतःकडील पैसे दिले तर केवळ याच मुलीला मदत होईल. इतरांना मदत करायची असेल तर कशी करणार ? असा प्रश्‍न त्यांना सतावत होता. अखेर त्यांनी व्हॉटस्‌ ऍपवर "ब्रॉडकास्ट' ग्रुप तयार केला आणि मदतीचे आवाहन केले. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह डॉक्‍टर, शेतकरी, प्राध्यापक, शिक्षकांनी मदत दिली. मदत देताना प्रत्येकाने आपले नाव कोठेही वापरू नये, प्रसिद्ध करू नये असेही स्पष्ट केले. त्यानुसार सुतार यांनी "त्या' मुलीला व्हिलचेअर आणि कमोड भेट दिला. यानंतर शिल्लक राहिलेल्या इतरांना मदत केली. आणि मदतीचा हा प्रयत्न असाच सुरू राहिला. प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, संदीप मगदूम, बाजीराव कांबळे, प्रसाद पाटील, लक्ष्मी पाटील, अशोक नायकवडे, कृष्णात कारंडे, हरीदास वर्णे, वैशाली सुतार, शांता वाकुडे, रुपाली पाटील, गीता कोरवी हे सदस्य संबंधितांपर्यंत मदत पोहचविण्यासाठी पुढे असतात. 

हे पण वाचा - 

सांत्वन करून दिली मदत 
करवीर तालुक्‍यातील एक महिला कॅन्सरने त्रस्त होती. उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून मुंबईतून कोल्हापुरातील सीपीआर मध्ये दाखल केले. तिला मदत करण्यासाठी एका शिक्षकांनी सुचविले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी समाजभान मधील सदस्य मदतीसाठी जातात. रविवारी जावून त्या महिलेस मदत करण्याचे नियोजित होते. मात्र शनिवारीच महिलेचे निधन झाले. अखेर सांतवणासाठी तिच्या घरी जावून तिच्या कुटुंबियांना समाजभान ग्रुपने मदत केली. 

"गुगल पे'वरून मदत 
काही डॉक्‍टर, प्राध्यापक जिल्ह्याचे बाहेरचे सुद्धा आहेत. त्यांच्याकडून थेट "गुगल पे' द्वारे मदत केली जाते. माणुसकीचे काम करत रहा आम्ही सहकार्य करत राहतो, असेही ते सांगत असल्याचे विश्‍वास सुतार यांनी दै.सकाळशी बोलताना सांगितले 

दीडशे विद्यार्थ्यांचे शिबीर घेऊन समाजभानाबद्दल प्रबोधन केले 
ग्रुपची विश्‍वासर्हृता आहे. मदत केल्यानंतर ग्रुपवर माहिती दिली जाते. तीन महिन्यांनी सर्व हिशेब ग्रुपवर दिला जातो. 
समाजभान विस्तारतोय ः शाखा सुरू करणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com