esakal | शासकीय इतमामात जवानावर अंत्यसंस्कार 
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur Mangaon soldier dies in Mizoram

र्षांच्या कारकिर्दीत त्यांनी बंगलोर, राजस्थान, गुजरात, जम्मू काश्‍मीर, आसाम, त्रिपुरा येथे सेवा बजावली आहे.

शासकीय इतमामात जवानावर अंत्यसंस्कार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भेडसगाव, (कोल्हापूर) : माणगाव (ता. शाहूवाडी) येथील भारतीय सीमा सुरक्षा दलात सेवेतील उदयसिंह पांडुरंग पाटील (वय 43) यांचे मिझोराममधील आय झोन सेक्‍टर येथे कर्तव्य बजावत असताना मंगळवारी (ता. 13) हृदयविकाराने निधन झाले. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर माणगाव येथे अंत्यसंस्कार केले. 

उदयसिंह पाटील 1998 मध्ये देशसेवेत रुजू झाले होते. 22 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी बंगलोर, राजस्थान, गुजरात, जम्मू काश्‍मीर, आसाम, त्रिपुरा येथे सेवा बजावली आहे. गत महिन्यात ते गावी आले होते. मंगळवारी मिझोराम येथील आय झोन सेक्‍टरमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांचे निधन झाले. काल त्यांचे पार्थिव कोलकाताहून विमानाने मुंबईत आणले. तेथून बीएसएफच्या वाहनाने माणगाव येथे आणले. पार्थिव घरी आणल्यानंतर पत्नी, मुले, भाऊ, बहीण यांसह नातेवाईकानी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्‍टरमधून त्यांची गावातून अंत्ययात्रा काढली. शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देऊन पार्थिवाला भडाग्नी दिला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. 

हे पण वाचाआता ग्राहकांना मिळणार टेट्रापॅक दूध

खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र देशमुख, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे