हद्द झाली ; आता सोने, चांदी नाही तर चक्क चोरट्याचा कांदा, बटाटावर डल्ला 

राजेश मोरे
Thursday, 29 October 2020

मार्केट यार्ड येथील प्रकार ; पत्रा उचकटून कृत्य 

कोल्हापूर : मार्केट यार्ड येथील दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्याने आत प्रवेश करून 60 हजाराहून अधिक किमंतीच्या कांदा, बटाटा, लसूनावर डल्ला मारला. याची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली. रोकड, सोने, चांदी, किमंती ऐवजासह रोकडबरोबर आता चोरट्याने कांदा बटाटावर लक्ष केंद्रीत केल्याने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती,

प्रकाश उत्तमचंद्र उब्रराणी (वय 57, रा. ताराबाई पार्क) हे व्यापारी आहेत. त्यांचे मार्केट यार्ड येथे प्रकाश ट्रेडिंग व मुसली ऍन्ड सन्स्‌ नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री त्यांनी हे दुकान नेहमीप्रमाणे बंद केले. दरम्यान चोरट्याने दुकानाच्या उजव्या बाजूचा वरचा पत्र उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर मुख्य दरवाज्याला आतून कडी लावली.

हेही वाचा- एक नोव्हेंबरला महाराष्ट्राचे सर्व मंत्री दंडाला काळी फीत बांधून करणार काम -

दुकानातील पाच पोती लसून, सात पोती बटाटा, 10 पोती वेगवेगळ्या प्रतिचा कांद्याची 10 पोती लंपास केली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आला. याबाबतची उब्रराणी यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार 61 हजार 500 रूपयाचा कांदा, बटाटा, लसूनची पोती चोरीस गेल्याची नोंद झाली. याबाबत अधिक तपास सहायक फौजदार राजू वरक करीत आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur Market Yard area thief onion on the potato