कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्‍सप्रेस  एक फेब्रुवारीपासून सुरू 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

याशिवाय दिर्घपल्ल्याच्या रेल्वे गाड्या हळूहळू सुरू करीत आहोत.

कोल्हापूर - कोरोनाकाळात बंद केलेली कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्‍सप्रेसही रेल्वे गाडी येत्या एक फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येईल तसेच कोल्हापूर - वैभववाडी मार्गाचे काम येत्या वर्षभरात सुरू करण्याचा प्रयत्न आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी आज व्हर्च्युल (अभासी) पत्रकार परिषदेत दिली. 

कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे मार्ग प्रलंबीत असल्याच्या मुद्दावर श्री. मित्तल म्हणाले की, ""कोल्हापूर -वैभववाडी मार्गाचे सर्व्हेक्षणकरून डीपीआरही केंद्रीय रेल्वे विभागाकडे पाठविला होता त्याला मंजूरीही मिळाली होती. मात्र निधी अभावी पुढे काम होऊ शकलेले नाही. अशीच अन्य तांत्रीक कामे निधी अभावी अपूर्ण आहेत ती येत्या वर्षभरात सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.'' 

कोरोना लॉकडाऊन काळात बंद पडलेली रेल्वे प्रवासी वाहतुकपूर्ण क्षमतेने केव्हा सुरू होणार या प्रश्‍नावर श्री. मित्तल म्हणाले की, "" राज्य शासनशी रेल्वे विभाग समन्वय साधून आहे. आम्ही कोरोनाकाळात श्रमीकांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध केली. त्यानंतर विशेष रेल्वे गाड्याही सुरू केल्या आहेत. याशिवाय दिर्घपल्ल्याच्या रेल्वे गाड्या हळूहळू सुरू करीत आहोत. कोरोनाची स्थितीबाबत केंद्र व राज्य सरकारच्या सुचना व कोरोनाची स्थिती विचारात घेऊन गाड्या सुरू करण्यावर आमचा भर आहे.'' 

कोल्हापूर - पुणे मार्गाबाबत मार्गदर्शन करु 
कोल्हापूर -पुणे नव्या रेल्वे मार्गाबाबत श्री. मित्तल म्हणाले की, हा प्रकल्प महारेलच्या अखत्यारीतील आहे, त्या मार्गाबाबत महारेल सोबत काही चर्चा झाल्या आहेत. या मार्गासाठी महारेलने आमच्याकडे तांत्रीक मार्गदर्शन मागविल्यास आम्ही तेही देण्यास तयार आहोत . 

हे पण वाचाधक्कादायक! सांगलीत कुटुंबात तिघांनीही संपवली जीवनयात्रा  

कोल्ड स्टोरेज व्यवस्थेची सुविधा 
रेल्वेने माल वाहतुक सेवाही सुरू आहे. यात कोल्हापूर - सांगलीतून शेतीमाल वाहतुक होते त्यासाठी कोल्डस्टोरेजची व्यवस्थाही अपेक्षीत आहे मात्र, विभागीयस्तरावर मागणी झाल्यास माल वाहतूक वाढण्याची खात्री असल्यास तशी व्यवस्था करण्याबाबत विचार केला जाईल असेही श्री. मित्तल यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Mumbai Mahalakshmi Express starts from February 1