कोल्हापुरात महापालिका घरफाळ्यात सवलत  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचीही थकबाकी 34 कोटी 34 लाख इतकी आहे

कोल्हापूर - महापालिकेची विविध विभागाची थकबाकी वसुल व्हावी, यासाठी महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी घरफाळा आणि पाणीपट्टीतील थकित बिलावरील व्याज आणि दंडात सवलती देण्याची योजना आज जाहीर केली.यापुर्वी केवळ निवासी वापरासाठी असणाऱ्या मिळकतीवरील दंड आणि व्याजात सवलत देण्यात आली होती.या सवलतींचा लाभ नागरिकांनी घ्यावा,व महापालिकेची थकित रक्कम भरावी,असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यातवतीन डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई,उपायुक्त निखिल मोरे,जलअभियंता नारायण भोसले,डॉ.अमोल माने आदी उपस्थित होते. 

हद्दतील व्यावसायिक मिळकतधारकांच्या थकित घरफाळ्यावरील दंड आणि व्याजात सवलतीची योजना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज जाहिर केली. यापुर्वी निवासी वापरातील मिळकतीच्या घरफाळ्यातील दंड आणि व्याजातही 70 टक्के सवलतीची योजना जाहीर करण्यात आली आहे.थकित घरफाळा,पाणीपट्टी बिलावरही आज योजना जाहीर करण्यात आली. कमर्शियल वापरातील एक हजार चौरस फुटावरील मिळकतधारकांनी थकित रक्कम एकदम भरल्यास दंड आणि व्याजात फेब्रुवारीअखेर 50 टक्के सवलत,मार्चअखेर 40 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. एक हजार चौरस फुटावर फेब्रुवारी अखेर 40 टक्के तर मार्चअखेर 30 टक्के सवलत देण्याचानिर्णय घेण्यात आला आहे.निवासी वापरातील मिळकतींच्या थकित दंड आणि व्याजावर जानेवारी 2021 अखेर 70 टक्के फेब्रुवारी अखेर 60 टक्के व मार्चअखेर 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.एक हजार चौरसफुटावरील मिळकतीसाठी जानेवारी अखेर 50 टक्के,फेब्रुवारी अखेर 40 टक्के,मार्चअखेर 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे. 

हे पण वाचाVideo - काँग्रेस पक्ष रसातळाला का गेला? राजू शेट्टी यांनी सांगितले कारण

 

पाणीपट्टी थकबाकीतही सवलती 
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचीही थकबाकी 34 कोटी 34 लाख इतकी आहे.सरकारी कार्यालयांची थकबाकी वगळून ही रक्कम आहे.या थबकाबीवरील दंड आणि व्याज 8 कोटी 98 लाख इतके आहे.पाणीपुरवठा थकबाकीदारांनी संपुर्ण थकबाकीभरल्यास फेब्रुवारी अखेरपर्यंत दंड आणि व्याजात 40 टक्के तर मार्चअखेर 30 टक्के सवलत देण्यात आली आहे.स्पॉट बिल आकारणीत कोणतीही सवलत दिली जाणार नाही.या सवलतीमुळे महापालिकेचे थकित 34 कोटी व दंड आणि व्याज 4 कोटी जमा होईल,अशी अपेक्षा आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur municipal corporation