
कोल्हापूर : कोरोनामुळे महापालिकेवर आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी काही प्रमाणात महापालिकेतील स्क्रॅपचा हातभार लागणार आहे. महापालिकेची जुनी वाहने, कचऱ्याची वाहने, घंटागाडी, कंटेनर, कोंडाळा, कचरा वाहतुकीसाठीची आरसी वाहने स्क्रॅपमध्ये काढण्याचा प्रस्ताव आहे. हे स्क्रॅप आता ऑनलाईन निविदेव्दारे विकले जाणार आहे.
याव्दारे महापालिकेला लाखो रुपये मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. केवळ 25 टक्के रक्कम तिजोरीत जमा आहे. उर्वरित रकमेसाठी महापालिकेला कसरत करावी लागत आहे. एका बाजूला कोरोना महामारीमुळे पाच ते सहा कोटींचा अतिरिक्त खर्च महापालिकेला करावा लागला तर दुसऱ्या बाजूला कोरानाने अर्थकारणच थांबविल्यामुळे फटका बसला आहे. महापालिकेकडे येणारे जे प्रमुख मार्ग आहेत. त्यात घरफाळा विभाग, नगररचना विभाग, इस्टेट विभाग, परवाना विभाग आदींचे उत्पन्नही घटले आहे.
विविध विभागांकडे मोठ्या प्रमाणात स्क्रॅप आहे. यात शिक्षण मंडळ,आरोग्य विभाग, पवडी विभाग, इस्टेट विभाग, केएमटी आदींचा यात समावेश आहे. सहा महिन्यांपासून वर्कशॉप विभागाने सर्व विभागांना पत्रांव्दारे कळवून स्क्रॅप किती आहे. याची माहिती मागविली आहे. काही विभाग सोडले तर बहुतांशी विभागांची माहिती आली आहे.
आरोग्य विभागाचे
सर्वाधित स्क्रॅप
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सर्वाधिक स्क्रॅप आहे. यात लोखंडी कंटेनर (कोंडाळे), कचरा उठावाची आरसी वाहने, इतर वाहने यांचा समावेश आहे. मूल्य निर्धारकांकडून मूल्यांकन करून घेऊनच त्याची किंमत निश्चित करण्यात येणार आहे.
विक्रीची अशी होणार प्रक्रिया
* महापलिकेच्या सर्व स्क्रपचे प्रथम मूल्यांकन होईल.
* त्यानंतर स्क्रॅपची किंमत निश्चित होईल
* मूल्यनिश्चीतनंतर निविदा काढण्यात येईल
* निविदेनंतर ऑनलाईन पद्धतीने टेंडर मागविणार
* शेवटी लिलाव प्रक्रिया होईल
जुन्या वाहनांचाही समावेश
महापालिकेच्या वर्कशॉपमध्ये अनेक जुनी वाहने आहेत. अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी वापरलेल्या जुन्या ऍम्बेसिटर गाड्या, विविध मोटारी, महापालिकेच्या दैनंदिन वापलेली इतर वाहने यांचा समावेश आहे. या वाहनांविषयीही निर्णय घेऊन त्यांचेही मूल्यांकन केले जाईल.
जागाही रिकामी होणार
स्क्रॅपमुळे महापालिकेची विविध ठिकाणी वर्षानुवर्षे अडकून पडलेली जागाही रिकामी होणार आहे. सध्या महापालिकेलाही जागा रिकामी पडत आहे. सुभाष स्टोअर्सची जागा स्क्रॅपनेच व्यापली आहे. स्क्रॅप विक्री काढल्यामुळे महापालिकेच्या मोक्याच्या जागा रिकाम्याही होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.