कोल्हापुरात कोवीड योद्धाच कोरोनाबाधित

डॅनियल काळे
शुक्रवार, 31 जुलै 2020

शहरात आज 86 नव्या रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1496 झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे काम करणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या एका उपशहर अभियंत्यांनाच कोरोना लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर ः शहरात आज 86 नव्या रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1496 झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे काम करणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या एका उपशहर अभियंत्यांनाच कोरोना लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

शहरातील हॉस्पिटल हाउसफुल्ल आहे. प्रशासन महासैनिक दरबार आणि आयसोलेशन हॉस्पिटल येथे नवे बेड तयार करत असून हे काम अंतिम टप्यात आहे. दोन्ही ठिकाणी मिळून किमान दोनशेहून अधिक बेड तयार होतील. याबाबतीत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शहरातील आकडा आज तुलनेने कमी असला तरी आलेल्या सर्व स्वॅबचे अहवाल पूर्ण झाले नसल्याने ही संख्या आठवड्याभरातील एकूण संख्येच्या तुलनेत कमी दिसत आहे. 

कोरोनाबाधित रुग्ण आजचे आजअखेरचे 
राजारामपूरी 13-124, कसबा बावडा 1-81, जवाहरनगर 2-55, यादवनगर 1-53, मंगळवार पेठ 8-50, कदमवाडी 1-45, शाहूपूरी 5-44, ताराबाई पार्क 4-43, शनिवार पेठ 1-38, लक्षतीर्थ 4-35, रंकाळा 5-35, रविवार पेठ 3-32, उत्तरेश्‍वर पेठ 1-27, विक्रमनगर 1-26, फुलेवाडी 1-25, सानेगुरुजी वसाहत 3-22, लक्ष्मीपुरी 1-18, राजेंद्रनगर 2-17, उद्ममनगर 1-17, शास्त्रीनगर 9-15, रुईकर कॉलनी 2-12, सम्राटनगर 1-11, जाधववाडी 4-10, रायगड कॉलनी 2-10, जरगनगर 4-9, शिवाजी पार्क 1-9, बुधवार पेठ 2-8, गंगावेश 1-6, सदरबाजार 1-5, सायबर चौक 1-4 अशी विभागनिहाय स्थिती आहे. 

शासकीय पॉझिटिव्ह; 
खासगीत निगेटिव्ह 

कोरोना आहे की नाही, हे तपासणीसाठी स्वॅब घेतले जातात; पण अनेकांनी अहवालाविषयी शंका उपस्थित केली. सरकारी यंत्रणेकडे दिलेला अहवाल पॉझिटिव्ह येतो तर खासगी ठिकाणी निगेटिव्ह आल्याच्या तक्रारी आहेत. आम्ही पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येते, तसा अहवाल येतो; पण प्रत्यक्षात लक्षणे दिसत नसल्याचे अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबतीत नेमका गोंधळ काय आहे, याची वरिष्ठांनी दखल घ्यायला हवी आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करायला हवा, अशीही चर्चा केली जात आहे. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kolhapur, only Kovid warriors are coronated