कोल्हापूर ; पेठवडगावातील पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जुलै 2020

त्यांच्या कुटूंबातील तीघांचे, एक कामवाली महिला आणि संपर्कात आलेला पोलिस अशा पाच जनांचे स्वॅब उद्या घेतले जाणार आहेत.

पेठवडगाव (कोल्हापूर) : येथील पोलिस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्यासह त्यांच्या आईचा कोरोना आहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ते त्यांच्या मुळगावी नातेवाईकांच्याकडे गेले होते. त्याठिकाणी संसर्ग झाल्याचा संशय आहे.

दरम्यान, त्यांच्या कुटूंबातील तीघांचे, एक कामवाली महिला आणि संपर्कात आलेला पोलिस अशा पाच जनांचे स्वॅब उद्या घेतले जाणार आहेत. शिवाय पोलिस ठाण्याचा भाग प्रतिबंधीत केला आहे. संबंधीत पोलिस अधिकारी पत्नी, दोन मुलांसह राहतात. ते त्यांच्या मुळ गावी कामानिमित्त २२ जुलैला गेले होते. ते काम झाल्यानंतर त्यांची वृध्द आईला घेवून २७ जुलैला सकाळी परतले. आल्यानंतर त्यांनी स्वत:हून पालिका प्रशासनास कळवले. त्यानंतर पालिका प्रशासनाने दोघांचे स्वॅब घेण्यासाठीचे पत्र दिले. दोघांचे स्वॅब अतिग्रे येथील कोव्हीड सेंन्टरमध्ये घेण्यात आले. त्याचा आहवाल आज सायंकाळी पॉझिटीव्ह आला.

हे पण वाचाब्रेकिंग ; कोल्हापुरात कोरोनाने ओलांडला पाच हजारचा टप्पा; आज तब्बल एवढ्या जणांना लागण

 

पालिका प्रशासनाने पोलिस ठाणे इमारत व निवासस्थानात औषध फवारणी करुन निर्रजंतुकीकरण सुरु होते. पाेलिस ठाण्याचा भाग सील करुन प्रतिबंधीत केला आहे. दरम्यान, या पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेली त्यांची पत्नी, मुलगा-मुलगी, घरकाम करणारी महिला, एक पोलिस अशा पाच जनांचा स्वॅब गुरुवारी सकाळी अतिग्रे कोव्हीड सेंन्टरमध्ये घेतला जाणार आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur peth vadgaon police officer corona positive