कोल्हापूरकरांना महापुराच्या काळात केवळ १५ मिनिटांत मिळणार मदत

Kolhapur residents will get help in just 15 minutes during the flood
Kolhapur residents will get help in just 15 minutes during the flood
Updated on

कोल्हापूर - एक दुसरे के वासते मरणा पडे तो है तय्यार हम... या प्रमाणेच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन महापुराच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार झाले आहे. ग्रामीण भागातील आपत्तीकाळात केवळ अर्ध्या तासात तर शहरात १५ मिनिटांत मदत पोहचवण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.

जिल्ह्यात महापुराच्या काळात कोणत्याही तालुक्‍यात आपत्ती निर्माण झाल्यास केवळ अर्ध्या तासात, तर शहरातील आपत्तीवेळी १५ मिनिटांत मदत देण्याचे नियोजन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी अधिक प्रमाणात बोटी आणि लाईफ जॅकेटची व्यवस्था केली आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांची फौजही तयार करण्यात आली आहे. त्यामुळे संकट कितीही मोठे असले तरीही आम्ही खंबीर असल्याची भूमिका आता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतली जात आहे. 

शहरातील आपत्ती व्यवस्थापनाचे काम अग्निशमन दलाकडून होणार आहे. तर प्रत्येक तालुक्‍यातील आपत्ती व्यवस्थापन त्या त्या तालुक्‍यातून नियंत्रित होणार आहे. त्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात असणार आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा सर्व डाटा तयार करण्यात आला आहे. कोठे कोणते साहित्य आहे? कोणत्या ठिकाणी कोण स्वयंसेवक आहे? याचीही अपडेट माहिती कक्षात उपलब्ध आहे. सध्या २४ तास हा कक्ष सुरू आहे. एसएमएस सुविधेसह आरोग्य, वीज, पाटबंधारे, बांधकाम, महसूल अशा सर्वच पातळीवर येथे नियोजन झाले आहे.  

आकडे बोलतात 
गतवर्षी बोटींची संख्या १७  
यावर्षी ५५गतवर्षी सेफ्टी रिंग ११० 
यावर्षी ३१०
गतवर्षी स्वयंसेवक ६०० यावर्षी ८००
गतवर्षी लाईफ जॅकेट २०० 
यावर्षी ५५०


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com