त्या चिमुरडीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली पण...

kolhapur shirol tahsildar help for corona positive girl
kolhapur shirol tahsildar help for corona positive girl

कोल्हापूर - ती बारा वर्षाची चिमुरडी, शिरोळ तालुक्‍यातील औरवाड तिचं गांव. कोरोनाची कोणतीही लक्षणं नसताना तिचा अहवाल पॉझीटीव्ह आला. कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच घसरली. तातडीने तिला कोल्हापुरच्या छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात दाखल करण्यात आले तर तिच्या तीव्र संपर्कातील कुटुंबातील सर्वांनाच शिरोळमध्ये अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. आई-वडिलांपासून 50 किलोमीटर दूर पहिल्यांदाच आणि तेही रूग्णालयात राहीलेल्या आपल्या चिमुरडीची काय अवस्था असेल या कल्पनेनेच कुटुंबाची घालमेल वाढली होती. अशा परिस्थितीत शिरोळच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी रोज तिच्याशी संपर्क साधून आधार दिलाच पण तिचे मनोबल वाढताना आई-वडिलांच्या अपरोक्ष मायेची ऊबही दिली. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलिसांप्रमाणेच महसूल विभागाचे कर्मचारीही दिवसरात्र राबत आहेत. तालुक्‍यात येणाऱ्यांची नोंद करणे, बाहेरून येणाऱ्यांच्या अलगीकरणाची व्यवस्था करणे अशा अनेक कामातून स्वतःच्या कुटुंबियांकडेही वेळ द्यायला अधिकाऱ्यांना सवड मिळत नाही. अशा परिस्थितीत अधिकारी पदाचा डामडौल बाजूला ठेवून डॉ. मोरे यांच्यातील आईपण या निमित्ताने पहायला मिळाले. 

या चिमुरडीला सीपीआरमध्ये ठेवल्यानंतर तिच्याशी संपर्क व्हावा म्हणून कुटुंबियांनी तिला मोबाईलही दिला होता. कुटुंबातील कोणताही सदस्य किंवा ओळखीचा कुणीही जवळ नाही. अशा परिस्थितीत उपचार घेणाऱ्या या लहान लेकराला तिथे करमत असेल काय?, तिला काय त्रास होत असेल काय?, ती आईवडिलांची आठवण काढून रडत असेल काय?, तिच्यावर योग्य उपचार सुरू असतील काय?, ती या सगळ्या परिस्थितीला घाबरून गेली असेल काय? अशा प्रश्‍नांनी कुटुंबिय अस्वस्थ, त्यातून तिच्याशी संवाद साधत सर्वजण आधार देत होते. तिच्याशी कुटुंबिय संवाद साधत असताना समजले की आमच्याशिवायही एक जण तिला आधार देत आहे आणि त्या तहसीलदार डॉ. मोरे आहेत. 

प्रशासनातील तालुक्‍याच्या प्रमुख म्हणून अनेक कामे करावी लागत असताना त्यातून वेळ काढून डॉ. मोरे रोज या मुलींशी बोलतात, तिला धीर देतात, स्वतःच्या मुलीसारखीच असलेल्या आणि कुटुंबापासून लांब असताना कोरोनाशी लढा देणाऱ्या मुलीशी बोलता. एवढेच नव्हे तर स्वतःच्या मुलीलाही तिच्याशी बोलायला सांगतात. त्यातून एकमेकाला कधीही न पाहिलेल्या या दोन मुलीही चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. या निमित्ताने डॉ. मोरे यांनी पदाचा बडेजाव बाजूला ठेवून आणि जाती-धर्मांच्या पलिकडे जाऊन केलेले एक आदर्श वस्तुपाठ समाजासमोर ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com