कोल्हापूर जिल्हा परिषदेतील वॉटर एटीएम घोटाळा अहवाल धूळ खात

सदानंद पाटील
Thursday, 1 October 2020

कोल्हापूर : जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून बसवण्यात आलेल्या वॉटर एटीएममध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व घोटाळ्यावर दैनिक "सकाळ'ने प्रकाशझोत टाकला. हा सर्व प्रकार उघडकीस आणल्यानंतर मंत्रालयातून चौकशी करण्याचे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. त्यानुसार ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चार दिवस चौकशीही केली. समितीने अहवाल मंत्रालयात सादरही केला आहे. मात्र अजूनपर्यंत याप्रकरणी काहीच कारवाई झाली नाही. विरोधकांकडून याप्रकरणी आता टीका होऊ लागली प्रकरण दडपल्याची व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप होऊ लागला आहे. 
जिल्हा परिषदेच्या

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व अभियांत्रिकी विभागाकडून वॉटर एटीएम बसवण्यात आले. या कामाची निविदा प्रक्रिया, दर, कामाची कंत्राटादारांमध्ये विभागणी व महत्त्वाचे म्हणजे गावामध्ये वॉटर एटीएम न बसवता दिलेले पैसे हा सर्वच विषय संशयात सापडला. याचबरोबर घनकचऱ्यावर प्रक्रियेसाठी कोटभर रुपये खर्च करून कचरा प्रकल्प बसवण्यात आले. मात्र याबाबतचे गावांना योग्य ते मार्गदर्शन न झाल्याने व त्याच्या उपयुक्‍ततेची कोणतीही खात्री न केल्याने हा खर्च कचऱ्यात गेला आहे. या सर्व प्रकरणावर दैनिक "सकाळ'ने प्रकाशझोत टाकला. याची दखल घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चौकशीचे आदेश दिले. उपसचिव उदय जाधव व तीन सहकाऱ्यांनी ही चौकशी पार पाडली. जिल्हा परिषदेत एक दिवस तक्रार अर्ज स्वीकारण्यात आले. पदाधिकारी व सदस्यांनी 25 पेक्षा अधिक तक्रार अर्ज दिले. यानंतर समितीने दोन दिवस तक्रारप्राप्त गावात जाऊन प्रत्यक्षात कामांची पाहणी केली व लोकांशी संवाद साधला. अनेक ठिकाणी समितीच्या समोरच वॉटर एटीएम जोडणीचे काम सुरू होते. या वेळी लोकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. यात मोठा घोटाळा झाल्याचे ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी सांगितले. समितीने घनकचरा प्रकल्पांची पाहणीही केली. काही ठिकाणी केवळ पत्र्याच्या खोक्‍यात बंद असलेल्या मशीन पहायला मिळाल्या. याबद्दल समितीने नाराजी व्यक्‍त केली होती. कामांची पाहणी व कागदपत्रांच्या तपासणी नंतर समितीने अहवाल ग्रामविकास विभागाला सादर केला आहे. मात्र कारवाई होत नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 
..... 
वॉटर एटीएम व घनकचरा प्रकल्पात घोटाळा झाला आहे. याबाबत "सकाळ'ने सतत बातम्या प्रसिद्ध केल्या. मशीन बसवण्यापूर्वीच पैसे आदा करून मोठा भ्रष्टाचार केला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन अहवाल सादर झाला असताना कारवाई का होत नाही? ही कारवाई झाली नाही तर जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन करण्यात येईल. 
- विजय भोजे, विरोधी पक्ष नेते.

संपादन - यशवंत केसरकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Zilla Parishad water ATM scam report eats dust