कोल्हापूरकरांना कळविण्यात येते की, आज पाणी नाही

 Kolhapurkar are informed that there is no water
Kolhapurkar are informed that there is no water

कोल्हापूर : शहरातील ए, बी व ई वॉर्ड आणि त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील नागरिकांना कळविण्यात येते, की तपोवन ग्राउंड शेजारील शिंगणापूर योजनेवरील 1100 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य वितरण नलिकेस गळती लागली आहे. ती उद्या (ता. 6) काढण्यात येणार असल्याने शिंगणापूर योजनेवरून वितरित होणाऱ्या भागातील नळ कनेक्‍शनधारकांना दैनंदिन होणारा पाणीपुरवठा बंद राहील. मंगळवारी (ता. 7) पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. 

पाणी पुरवठ्यावर परिणाम होणाऱ्या भागांची नावे :  ए, बी वॉर्ड- आपटेनगर रिंगरोड परिसर, कणेरकरनगर, पुईखडी उंच टाकी परिसर, जिवबानाना जाधव पार्क, क्रांतिवीर नाना पाटीलनगर परिसर व संलग्नित राजोपाध्येनगर परिसर, बापूरामनगर परिसर, महाराष्ट्रनगर परिसर, सुर्वेनगर, साळोखेनगर टाकी परिसर, निकम पार्क, संभाजीनगर, कळंबा फिल्टर परिसर, तपोवन, एलआयसी कॉलनी, हनुमाननगर, रेसकोर्स नाका परिसर, गंजी माळ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ काही भाग इ., हॉकी स्टेडियम, सुभाषनगर संप व पंपावरून वितरित होणारा भाग, जवाहरनगर परिसर, नेहरूनगर, वाय. पी. पोवारनगर, आर. के. नगर, बळवंतनगर आदी व शिंगणापूर योजनेवरून वितरित होणारा भाग. 

ई वॉर्ड- संपूर्ण राजारामपुरी, मातंग वसाहत, बागल चौक, शिवाजी उद्यमनगर परिसर, शास्त्रीनगर परिसर, सागरमाळ परिसर, राजेंद्रनगर, वैभव सोसायटी परिसर, दौलतनगर, शाहूनगर, जामसांडेकर माळ, महाडिक माळ, माळी कॉलनी, टाकाळा परिसर, वड्डवाडी, सम्राटनगर, शिवाजी विद्यापीठ परिसर, इंगळेनगर, काटकर माळ परिसर, रुईकर कॉलनी, मार्केट यार्ड, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, शाहूपुरी परिसर, शिवाजी पार्क, लिशा हॉटेल परिसर आदी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com