आयलिग फुटबॉलमध्ये कोलकत्याचा संघ निश्‍चित

दीपक कुपन्नावर
Friday, 16 October 2020

कोलकत्ता येथे सुरू असलेल्या इंडियन लिग (आय लिग) प्रथम श्रेणी पात्रता फुटबॉल स्पर्धेत स्थानिक मोहामेडन स्पोर्टिंग, भवानीपूर एफसी यांनी आपापले दोन्हीं साखळी सामने जिंकुन घौडदौड सुरू ठेवली आहे.

कोलकत्ता : येथे सुरू असलेल्या इंडियन लिग (आय लिग) प्रथम श्रेणी पात्रता फुटबॉल स्पर्धेत स्थानिक मोहामेडन स्पोर्टिंग, भवानीपूर एफसी यांनी आपापले दोन्हीं साखळी सामने जिंकुन घौडदौड सुरू ठेवली आहे. त्यामुळे गुण तक्‍त्यात आघाडीवर असणाऱ्या या दोनपैकी एकाला बढती मिळणार असल्याने आयलिगमध्ये कोलकत्ताचा संघ असणार हे निश्‍चित झाले आहे. या दोघांतील महत्वपुर्ण सामना उद्या (ता. 16) होणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे येथील युवा भारती क्रीडांगण आणि कल्याणी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पाच संघ सहभागी आहेत. 

कोरोनामुळे गत हंगामात व्दितीय श्रेणी आयलिग स्पर्धा मार्चमध्ये अर्धवट राहिली. परिणामी, या हंगामात प्रथम श्रेणीत सहभागी होणारा संघ ठरू शकला नाही. त्यासाठी ही पात्रता स्पर्धा सुरू आहे. यंदा कोलत्यातील दिग्गज संघ मोहन बागान, ईष्ट बंगाल हे इंडियन सुपर लिग (आयएसएल) स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे आय लिगमध्ये भारतीय फुटबॅलची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोलकत्ता संघाचे अस्तित्व संपणार होते. मात्र, आता पात्रता स्पर्धेत मोहोमेडन आणि भवानीपूरने साखळी दोन्हीं सामने जिंकून कोलकत्याचे स्थान जवळपास निश्‍चित केले आहे. 

भवानीपुरने दिल्लीच्या गढवाल एफसीला 2-1 असे नमविले. भवानीपुरचा हा दुसरा विजय ठरला. या पुर्वी मोहामेडनने गढवाल एफसी, बंगळुर युनायटेडला हरवुन दोन विजयासह गुणतक्‍यातात आघाडी घेतली आहे. दोन्हीं संघाचे प्रत्येकी सहा गुण झाले आहेत. त्यामुळे स्पर्धेतील महत्वपुर्ण सामना उद्या या दोन संघात सायंकाळी होणार आहे. या सामन्यात विजयी होणाया संघाचे आयलिगचे टिकीट निश्‍चित होणार असल्याने फुटबॉल वर्तुळाचे याकडे लक्ष वेधुन आहे. हा सामना बरोबरीत सुटल्यास चौथ्या फेरीची प्रतिक्षा करावी लागेल. 

प्रशिक्षकाविरुध्द गुन्हा 
एकीकडे आय लिगसाठी कोणता कोलकत्याचा संघ पात्र ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, तर दुसरीकडे मोहामेडनने आपले प्रशिक्षक यान ला यांना दुसऱ्या सामन्यानंतर तडकाफडकी बडर्तफ केले. पाठोपाठ मोहामेडनने ला यांच्याविरुध्द पोलिसांत तक्रार दिली आहे. संघाची खासगी माहिती, रणनिती मिर्नवा पंजाब एफसीचे माजी प्रमुख राजीव बजाज यांना दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या पोलिस तक्रारीने फुटबॉल क्षेत्रात खळबळ माजली आहे. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolkata's inclusion in I-League football is certain Kolhapur Marathi News