बेलबागेजवळचे फूटपाथ नव्हे कोंडाळाच 

Kondala is not the sidewalk near Belbage
Kondala is not the sidewalk near Belbage
Updated on

कोल्हापूर : येथील रेसकोर्स नाका परिसरातील बेलबागेनजीक असणारे फूटपाथ कोंडाळ्यासोबतच जनावरांचे मल-मूत्र साठवण्याचे ठिकाण बनले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या फूटपाथवर बांधकाम साहित्यासह गाई-म्हशींचे शेण, खराब झालेल्या फरशीचे फोडून काढलेले ढीग, प्लास्टर असा अनेक प्रकारचा कचरा येथे आणून टाकण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. 

रेसकोर्स नाका ही जुन्या कोल्हापूरची ओळख होय. पूर्वी ज्या ठिकाणी शर्यतीसाठीचा ट्रॅक होता, त्या ठिकाणी आता रस्ता बनवला आहे. या रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या फूटपाथवर आणि त्या शेजारी असणाऱ्या जागेवर कचऱ्याचे ढीग साठले आहेत. एकंदरीत या ठिकाणची परिस्थिती पाहता संपूर्ण शहरातील बांधकामाचा कचरा येथेच आणून टाकला जातो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या बांधकामाच्या कचऱ्याबरोबरच येथे शेणाचे ढीग, तोडलेल्या झाडाच्या फांद्या, घरातील फोडून काढलेल्या फरशीच्या तुकड्यांचे ढीग, काढलेले प्लास्टर, रंगकामाचे खराब साहित्य अशा प्रकारच्या कचऱ्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

या परिसरातील सुमारे 500 मीटरहून अधिक अंतराच्या फूटपाथवर अशा पद्धतीचा कचरा टाकल्यामुळे हे फूटपाथ वापरणेही शक्‍य नाही. या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला लोकवस्ती आहे, तर काही अंतरावरच मंदिर आणि जनावरांचे आरोग्य केंद्रही आहे. अनेक वेळ असा कचरा टाकणाऱ्यांना हटकण्याचा प्रयत्न येथील स्थानिकांनी केला आहे. मात्र, त्यांना मिळालेल्या उद्धट उत्तरांमुळे त्यांचा देखील नाइलाज होत आहे. अशातच येथे कचरा टाकण्याच्या घटनेत दिवसागणिक वाढच होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन येथील नागरिक करत आहेत. 

दृष्टिक्षेप 
- फूटपाथ कोंडाळा, जनावरांचे मल-मूत्राचे ठिकाण 
- फूटपाथवर बांधकाम साहित्यासह गाई-म्हशींचे शेण 
- जागेवर कचऱ्याचे ढीग, झाडाच्या फांद्या 
- नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com