esakal | कुरुंदवाडमध्ये वाढता कहर; दिवसभरात सापडले 6 रूग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Kurundwad: 6 corona patients found

कुरुंदवाड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असून आज दिवसभरात चार तर मजरेवाडी लक्ष्मीनगरात दोन अशा सहा रुग्णांची भर पडली आहे.

कुरुंदवाडमध्ये वाढता कहर; दिवसभरात सापडले 6 रूग्ण

sakal_logo
By
अनिल केरीपाळे

कुरुंदवाड : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असून आज दिवसभरात चार तर मजरेवाडी लक्ष्मीनगरात दोन अशा सहा रुग्णांची भर पडली आहे. शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 वर पोहोचली आहे. 

येथील गोठणपूर परिसरातील बाधित शहरातील मोठ्या दूध संस्थेच्या डेअरीचा कर्मचारी आहे. ताप आल्याने त्याला मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. कोरोनाची लक्षणे असल्याने मिरज शासकीय रुग्णालयात स्वॅब तपासला असता आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला बाधा झाल्याची माहिती पालिकेला मिळताच घराचा परिसर प्रतिबंधित केला आहे. त्याच्या घरातील सर्वांना संस्थात्मक अलगिकरणात ठेवले असून उद्या (ता. 11) त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. 

चार दिवसांपूर्वी मिळून आलेल्या व्यावसायिक युवकाच्या आई-वडिलांनाही बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मजरेवाडी लक्ष्मीनगर येथील शिक्षकाला व त्यांच्या पत्नीलाही बाधा झाली आहे. शहरातील बायपास रस्त्यावरील वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवसभरात सहा रुग्ण सापडल्याने शहरात शुकशुकाट आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. रेखा तराळ यांनी गोठणपूर व बायपास रस्ता परिसरातील कुटुंबांना घरातच अलगीकरण केले असून लक्षणे दिसून आल्यास तात्काळ दवाखान्याशी संपर्क साधावे असे आवाहन केले आहे. 

दृष्टिक्षेप 
- कुरूंदवाड व परिसरात दिवसभरात सहा रूग्ण 
- कोरोना रूग्णांची संख्या पोचली 22 वर 
- बाधीतांच्या घरातील सर्व जण क्वारंटाईन 
- रूग्ण सापडल्याने कुरूंदवाड शहरात शुकशुकाट 

संपादन  : प्रफुल्ल सुतार