Covid 19 Update : कोल्हापुरात 24 तासात 1 हजार 180 व्यक्ती कोरोनामुक्त तर 800 नवे कोरोनाबाधित

शिवाजी यादव
Sunday, 20 September 2020

गेल्या चार दिवसात एकूण 310 व्यक्ती गंभीर सापडल्या आहेत.

कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1 हजार 180 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जवळपास 800 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. एकूण बाधितांची संख्या 39 हजार 670 झाली आहे तर कोरोनामुक्तांची संख्या 27 हजार 300 झाली आहे. तर दिवसभरात 5 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजवरची एकूण मृतांची संख्या एक हजार 226 झाली आहे. त्यामुळे कोरोनाची भिती कायम आहे. 

गेल्या चार दिवसात एकूण 310 व्यक्ती गंभीर सापडल्या आहेत. त्यापैकी सीपीआरमध्ये 260 आयजीएममध्ये 24, गडहिंग्लजमध्ये 13 तर उर्वरीत खासगी रूग्णालयात 60 जणांवर उपचार सुरू आहेत. सीपीआरमध्ये व्हेन्टीलेटर व ऑक्‍सिजनची सोय सक्षम असली तरी गंभीर बाधितांची संख्या जास्त आहे. यातील बहुतांशीजनांना कोल्हापूरात उपचारासाठी आणले जात आहे. त्यामुळे सीपीआरसह खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर बाधितांची संख्या वाढली आहे. याशिवाय जिल्ह्यातील 14 शासकीय रूग्णालयात दिवसभरात जवळपास 1 हजार 204 व्यक्तींचे स्वॅब घेतले आहेत. 

हेही वाचा- रेमडेसिव्हिरचा तुटवडा : सिप्ला ॲक्‍टमेरा पर्याय  ठरेल रेमडेसिव्हिरला -

जिल्ह्यातील 79 कोवीड सेंटरवरील सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. उर्वरीत सर्व गंभीर बाधितांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, गगनबावडा येथे कमी होत आहे. तसेच कोरोनामुक्तांची संख्या वाढती आहे. त्यामुळे याभागात कोवीड सेंटरवर बेड उपलब्ध होत आहेत. 

गेल्या 24 तासात तालुकानिहाय बाधिता मध्ये कोल्हापूर शहर 250 , इचलकरंजी 160, शिरोळ 35, करवीर 130, राधानगरी 20, चंदगड 15, पन्हाळा 35, गडहिंग्लज 88, राधानगरी 20, शाहूवाडी 40, अन्य राज्य 59 अन्य तालुक्‍यात 10 ते 30 व्यक्ती बाधित आहेत. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the last 24 hours 1,180 persons were released but 800 corona positive patient found in the kolhapur