esakal | चार दिवसात बेळगाव शहरात आले १२० जण...
sakal

बोलून बातमी शोधा

In the last four days one hundred thirty seven people come to Belgaum

गेल्या चार दिवसात महाराष्ट्रातून १०४ जण बेळगावात आले आहेत. याशिवाय गुजरात, राजस्थान व तमिळनाडू येथूनही नागरिक बेळगावात आले आहेत.

चार दिवसात बेळगाव शहरात आले १२० जण...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव - गेल्या चार दिवसात विविध राज्यांमधून १३७ जण बेळगाव शहरात आले आहेत. त्यापैकी १२० जणांचे संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले आहे. १७ जण पुन्हा त्या राज्यात माघारी गेले आहेत. हे सर्वजण वाहनचालक असल्याची माहिती महापालिका कार्यालयातून देण्यात आली. वरील १२० जणांना बेळगावात सोडून ते माघारी गेले आहेत. महाराष्ट्रातून बेळगावात आलेल्यांची संख्या सर्वात जास्त आहे.

महापालिकेतून मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार दिवसात महाराष्ट्रातून १०४ जण बेळगावात आले आहेत. याशिवाय गुजरात, राजस्थान व तमिळनाडू येथूनही नागरिक बेळगावात आले आहेत. या सर्वच जणांना विविध हॉटेल्स व लॉज मध्ये संस्थात्मक विलगिकरण करून ठेवण्यात आले आहे. मूळचे बेळगाव शहरातील पण नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने अन्य राज्यात गेलेल्यांना परत आणण्याची मोहीम सुरू झाली आहे. यासाठी कर्नाटक सरकारने सेवा सिंधू नावाचे मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या माध्यमांतून संबंधितांना ई पास उपलब्ध करून देण्यात आले.

वाचा - गुजरातहून आलेले ते 26 कोरोना पॉझिटिव्ह ; कर्नाटक राज्यात नवे 42 रुग्ण...

बेळगावकर ज्या राज्यात वास्तव्यास आहेत तेथील शासनाकडूनही ई पास उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे ९ मे पासून अन्य राज्यात अडकलेले बेळगाव शहरात येऊ लागले. पण त्या सर्वांची आरोग्य तपासणी करणे, त्यांचे संस्थात्मक विलगिकरण करणे ही जबाबदारी महापालिकेकडे देण्यात आली. महापालिकेने येथील सीपीएड मैदानावर यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या अधिक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे ही सर्व जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बेळगाव शहरात प्रवेश केल्यानंतर संबंधितांना थेट सीपीएड मैदानावर जावे लागेल. तेथे आरोग्य तपासणी झाल्यानंतरच विलगिकरण कक्षात जावे लागेल. जर कोणी थेट घरी जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांच्या घरातून पुन्हा सीपीएड मैदानावर आणले जाईल व तपासणी करून विलगिकरण कक्षात पाठविले जाईल. त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली जाईल. ई पास देण्यात आल्यामुळे परराज्यात असलेल्या व बेळगाव शहरात येऊ इच्छिणाऱ्यांची यादी महापालिकेकडे आहे. त्यामुळे कोणालाही आरोग्य तपासणी व संस्थात्मक विलगिकरनाची प्रक्रिया कोणालाच चुकविता येणार नाही. येत्या काही दिवसात बेळगावात येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेने तपासणी व विलगिकरण यंत्रणा सक्षम केली आहे.

९ ते १२ मे या काळात शहरात आलेल्यांची संख्या...

          राज्य           -    शहरात आलेल्यांची संख्या

  • महाराष्ट्र       -       १०४
  • गुजरात       -       १२
  • तमिळनाडू   -        २
  • राजस्थान    -        २
go to top