"लेकीचे झाड' उपक्रमास कागलमध्ये प्रारंभ

Launch of the "Leaky Tree" initiative in Kagal
Launch of the "Leaky Tree" initiative in Kagal

कागल, कोल्हापूर : वन मित्र संस्था कागल व वनकुरण केंद्र मौजे सांगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कागलमध्ये "लेकीचे झाड' ही पर्यावरणपूरक संकल्पना रुजविण्यात आली आहे. नव वधूवरांच्याहस्ते "वड व माळुंग' या वृक्षाचे वृक्षारोपण मौजे सांगाव येथील वनकुरण केंद्रात करण्यात आले. 
वनमित्र संस्थेच्या बैठकीत नवीन पर्यावरणपूरक संकल्पनेबाबत चर्चा करण्यात आली. मुलीचे लग्न ठरल्यानंतर तिच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात यावे, या वृक्षाचा सांभाळ मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या लेकी प्रमाणे करावा हा विचार समोर आला. त्यात "लेकीचे झाड' हे नाव देण्यात आले. 
वन मित्र नानासाहेब बरकाळे यांच्या मुलीचे लग्न ठरले. मुहूर्ता दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वधू देवयानी व वर दिपक हे वनकुरण केंद्रात आले. वधू-वरांच्या पेहराव्यात नखशिखांत नटलेल्या व कपाळावर मंडवळ्या बांधलेल्या अवस्थेत त्यांचा प्रवेश झाला. त्यांच्यासोबत व त्यांच्या पत्नी सौ.आशा बरकाळे व सावंत परिवारातील सदस्य होते. त्यांचा सत्कारही वनमित्र संस्था वनकुरण केंद्रातील सदस्यांनी केला. वर्षानुवर्षे टिकणारा कल्पवृक्ष म्हणजेच "वडाचे झाड' व अंबाबाईच्या हातातील फुल अर्थात लक्ष्मी रूपातील वधूसाठी "माळुंगा'चा वृक्ष या दोन वृक्षांचे वधू-वरांच्या हस्ते रोपण करण्यात आले. 
"लेकीचे झाड' या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होऊन पर्यावरणाला हातभार लागेल हा उद्देश संघटनेने मनाशी ठरवला आहे. त्याची सुरुवात देवयानी व दीपक या नव वधूवरांच्या हस्ते करण्यात आली आहे. 
कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. ज्यांना लेकीचे झाड लावायचे आहे. त्यांनी संघटनेशी संपर्क करावा, असे आवाहन वनमित्र संस्थेचे नंदकुमार पाटील व विक्रम चव्हाण यांनी केले. अमोल मगर, राजेंद्र घोरपडे, दिलीप जाधव आकाराम पाटील जगदीश पाटील दीपक लोहार, राहुल पाटील, नागेश पाटील, अविनाश निंबाळकर, गौरव पाटील, विशाल मिरजे, दिपके एकांडे, विनायक उपाध्ये उपस्थित होते. 
 

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com