
एसटीचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे तसेच विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
कोल्हापूर - "चालकांवर विश्वास ठेवूनच प्रवासी प्रवास करीत असतात मात्र चालकांच्या चुकातून अनेकदा अपघात घडतात. यात रस्त्यावरील चुकीला माफी नसते. शुल्लक चूक असली तरी गंभीर अपघात घडतात. त्यामुळे प्रत्येक चालकाने वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळणे महत्वाचे आहे.'' असे मत मोटर वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे यांनी आज येथे व्यक्त केले.
येथील एसटी महामंडळात वाहतूक सुरक्षीतता मोहिमेला सुरवात झाली. श्री. शिंगारे यांच्या हस्ते या मोहीमेचे उध्दघाटन झाले यावेळी ते बोलत होते. एसटीचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे तसेच विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
रोहन पलंगे म्हणाले, ""एसटी महामंडळाची व वाहतूक सुरक्षीतता मोहीम ही केवळ ठरावीक दिवसासाठी नाही तर प्रत्येक दिवसासाठी आहे हीच भावना चालकांनी लक्षात ठेवून सुरक्षीत गाड्या चालविणे महत्वाचे आहे. त्यासाठी सुरक्षीततेबाबत दिलेल्या सूचनांचा वापर नियमितपणे केला पाहीजे. त्यातून अपघातांची संख्या व कमी होईल प्रवाशांचा एसटी वरील विश्वास अधिक दृड होईल.''
हे पण वाचा - एका फाउंड्री उद्योगातील फर्नेस भट्टीचा अचानक ब्लास्ट झाला
आगार व्यवस्थापक अजय पाटील यांनी सुत्रसंचलन केले. वाहतूक अधिक्षक सतिश खाडे, स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे, चालक वाहक यांत्रीक कर्मचारी उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे