"राज्यपालांच्या विमानाला परवानगी न देणे हा तर सूडभावनेचा अतिरेक"

Leader of Opposition in the Legislative Council Pravin Darekar criticize on hasan mushrif political marathi news
Leader of Opposition in the Legislative Council Pravin Darekar criticize on hasan mushrif political marathi news

कोल्हापूर : राज्यपालांच्या विमानाला परवानगी दिली जात नसेल तर सूडभावनेचा हा अतिरेक आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार असल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या आणि राज्यपालांच्या कार्यालया दरम्यान समन्वय नसेल तर राज्य चालवायला हे सरकार खरचं पात्र आहे का? कसे असा सवाल प्रश्‍न त्यांनी केला 

दरेकर आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भक्कम असे संविधान दिले. राज्यपाल हे संविधनानुसारच काम करतात. त्यांच्याच विमानाला परवानगी मिळत नसेल तर ही बाब गंभीर आहे. सूडभावनेचा हा अतिरेक नाही तर आणकी काय आहे? इतक्‍या खालच्या टोकाला जाऊन कोणी राजकारण करू नये, राज्यपालांनी आमदारांची मान्यता रोखल्याने या पद्धतीने राजकारण होत असेल त्यावर दरेकर यांनी कायद्यानुसार जी कार्यवाही राज्यपाल करतील मात्र ते मान्यता देत नाही म्हणून सूडभावना कोणी ठेवत असेल तर ते योग्य नाही.

 मुख्यमंत्री वेगळा निर्णय घेतात. उपमुख्यमंत्री वेगळा निर्णय घेतात. कॉंग्रेसचा तिसराच निर्णय असतो. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचे आम्ही पूूर्वीपासूनच सांगत आलो आहोत. देशाला दिशा देणारा. आत्मनिर्भर करणारा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला असताना केवळ राजकारणापोटी महाविकास आघाडीचे नेते अर्थसंकल्पाला दूषणे देत आहेत. महाराष्ट्रासाठी तीन लाख 5 हजार 611 कोटींची तरतूद आहेत. यात रस्ते बांधणीसाठी एक लाख कोटींची तरतूद आहे. प्रत्येक घरात पाणी पोहचावे यासाठी एक हजार कोटींची तरतूद आहे. शेतकरी सन्मान योजनेसाठी 6823 कोटींची तरतूद आहे. रेल्वे प्रकल्पासाठी सात हजार कोटींची ऐतहासिक अशी तरतूद आहे. 

विज बिल न भरल्यास कनेक्‍शन तोडण्याचा इशारा दिला जात आहे या प्रश्‍नावर राज्य सरकारला बिल्डरांना प्रिमियम द्यायला वेळ आहे. दारूच्या परवाना शुल्कात सवलत दिली जाते. मात्र लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या विज बिलात सवलत द्यायला सरकार तयार नाही. कोरोनामुळे लोक संकटात सापडले होते. त्यांना दिलासा द्यायला हवा. त्यासाठी सवलतीच्या योजना द्या म्हणून पाठीमागे लागलो आहोत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भक्कम आहे. त्यांना लक्ष्य करण्यासाठी आणि वातावरण गढूळ करण्यासाठी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला जाणीवपुर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. मुंबईत सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करू नका. इतके बेफिकीर वागू नका.टप्याटप्याने तरी शंभर टक्के अनुदानाची मागणी मान्य करा, असे आवाहन त्यांनी केले. 

इशारे देणारे मुश्रीफ विरोधी पक्षनेते 
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे नेहमी इशारे देत असतात. दर आठवड्याला ते काही ना काही तरी बोलत असतात. सत्ताधाऱ्यातील विरुद्ध पक्ष नेते आहेत त्यांच्या कोणत्याही वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दरेकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. 

नैतिकता पाळावीच लागेल 
जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याकडे लक्ष वेधले असता दरेकर म्हणाले, पक्ष कोणताही असा नैतिकता सर्वानी पाळलीच पाहिजे. कोल्हापुरमध्ये तक्रार झाली आहे तिची सिद्धता तपासली जाईल नंतरच कार्यवाही संबंधी निर्णय होईल. केवळ तक्रार झाली म्हणून तातडीने कारवाई होणार नाही. 


यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे. शौमिका महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिक्कोडे. भगवान काटे, अशोक देसाई, विजय जाधव, अजित ठाणेकर आदि उपस्थित होते. 
 
महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल 
आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकेल असा विश्‍वास व्यक्त करताना सरकारने विकासकामांचा खेळखंडोबा केला आहे याची माहिती लोकांना असल्याचे दरेकर यांनी नमूद केले. 
 
पुणे वाढता क्राईम रेट चिंताजनक 
पुर्वी नागपूरला सर्वाधिक क्राईम रेट आहे म्हणून दूषणे दिली जायची. आजही शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील वाढता क्राईम रेट चिंताजनक आहे. मुली महिलांवर अत्याचार होते. एखाद्या प्रकरणात मंत्र्यांचा हात असेल तर पक्षापलीकडे जाऊन कारवाई व्हायला हवी असे दरेकर यांनी सांगितले. 


संपादन- अर्चना बनगे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com