आठ वर्षांनंतर जोतिबाच्या पायथ्याशी पुन्हा बिबट्याचा वावर

 Leopard cubs for two three days leopard was seen by some villagers of Jyotiba as well as farmers and herdsmen in Giroli area
Leopard cubs for two three days leopard was seen by some villagers of Jyotiba as well as farmers and herdsmen in Giroli area

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर ता. पन्हाळा येथील एसटी बसस्थानकाच्या खालील बाजूस  असणाऱ्या वीज कडा भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असून हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला आहे. या बिबट्याचे दर्शन जोतिबाच्या काही ग्रामस्थांना तसेच गिरोली भागातील  शेतकरी व गुराख्याना झाले आहे . त्यामुळे या भागातील वातावरण भयभीत झाले आहे.परिणामी , या ठिकाणी गवत कापणी शेतीची कामे करताना ग्रामस्थांना भय निर्माण झाल्यामुळे एकटा कोणी रानात जात नाही शेतकरी गटागटाने शेतात जातात.


 वीज कडा हा परिसर ज्योतिबा बसस्थानकाच्या खाली असणाऱ्या खोल दरी व डोंगर पठार असा आहे . पूर्वी या ठिकाणी वीज पडली होती त्या खुणाही या परिसरात एका दगडांमध्ये पाहण्यास मिळतात. म्हणून हा परिसर वीज कडा नावाने ओळखला जातो . गिरोली गावातून पन्हाळ्याकडे जाताना हा वीज कडा डोंगर लागतो. या ठिकाणी शेतीवाडी असून लहान वस्ती आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी या भागातून कोणी जाताना दिसत नाही लोकसमूहाने जाताना दिसतात .


 दरम्यान ,गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी याच भागात दोन बिबट्यांचा वावर सुमारे महिनाभर होता. त्यानंतर ते दिसलीच नाहीत. तब्बल सात आठ वर्षांनंतर यंदा हा बिबट्या निदर्शनास आला असून तो पूर्ण वाढ झालेला आहे असे ग्रामस्थ सांगतात . या ठिकाणी बिबटयास  पोषक असे वातावरण असून या ठिकाणी मोठ मोठे दगड तसेच गुहा आहे . भरपूर झाडेझुडपे व काही ठिकाणी बिबट्यास पाणी पिण्यासाठी पाण्याचे झरे ही आढळतात त्यामुळे या ठिकाणी त्याचा वावर आहे.

संपादन - अर्चना बनगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com