कुर्लीत बिबट्याचे दर्शन...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

उसाच्या शेतामध्ये बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास आले

कोगनोळी - कुरली ता.निपाणी येथील उसाच्या शेतामध्ये शुक्रवार ता. २२ रोजी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.
रामदास कमठे (कुरली) व भास्कर माने (आप्पाचीवाडी) हे शेतात गेले असता त्यांना उसाच्या शेतामध्ये बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास आले.ही बातमी वाऱ्यासारखी गावांमध्ये पसरल्याने आप्पाचीवाडी व कुर्ली येथे भीतीचे वातावरण पसरले.ग्रामपंचायत अध्यक्ष अमर शिंत्रे व इतर युवक शेतकरी या बिबट्याचा शोध घेत आहे घेत आहेत.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard was seen in a sugarcane field in Kurli Nipani