कागल तालुक्‍यातील पाच तलावांत 40 टक्केहून कमी साठा

Less Than 40% Reserves In Five Lakes In Kagal Taluka Kolhapur Marathi News
Less Than 40% Reserves In Five Lakes In Kagal Taluka Kolhapur Marathi News
Updated on

म्हाकवे : कागल तालुक्‍यातील करंजीवणे, बेनिक्रे, सोनाळी, हणबरवाडी, शेंडूर व पिंपळगाव या सहा लघु पाटबंधारे तलावातील पाण्याची साठवण क्षमता 299 : 53 दलघफूट आहे. या पाण्यावर 3 हजार 10 एकर शेती अवलंबून आहे. यापैकी केवळ शेंडूर तलावातील 68 टक्के साठा वगळता पाच लघु पाटबंधारे तलावात 40 टक्के पेक्षा कमी पाणीसाठा असल्याची माहिती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मारुती चव्हाण यांनी दिली.

या मुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे. 
कागल तालुक्‍यातील तलावांची सद्यस्थिती अशी, करंजीवणे तलावाची साठवण क्षमता 53 : 57 द.ल.घ.फू. आहे. या तलावाच्या पाण्याखाली 175 एकर शेती क्षेत्र ओलिताखाली येते. सध्या या तलावात 37 टक्के पाणीसाठा आहे. 

बेनिक्रे तलावाची क्षमता 64 : 34 द.ल.घ.फू. इतकी आहे. या तलावाच्या पाण्याखाली 286 हेक्‍टर शेती ओलिताखाली येते. या वर्षी तब्बल 14 वर्षांनी 12 ऑगस्ट 2019 रोजी तलाव ओव्हरफ्लो झाला होता. या तलावात सध्या 40 टक्के पाणी आहे. 
सोनाळी लघु पाटबंधाऱ्याची क्षमता 38 : 29 द.ल.घ.फू. आहे. या तलावाच्या पाण्यावर 154 हेक्‍टर लाभक्षेत्रात येते. सध्या साठा तलावात 34 टक्‍के पाणी आहे. 

हणबरवाडी क्षमता 94 : 29 आहे. या तलावाचे लाभक्षेत्र 367 हेक्‍टर आहे. सध्या या तलावात 40 टक्के साठा शिल्लक आहे. शेंडूर लघु पाटबंधाऱ्याची क्षमता 24 दलघफू असून 130 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येते. सध्या तलावात 68 टक्के पाणी आहे. 
पिंपळगाव (व्हन्नूर) तलावाची 23 : 04 द.ल.घ.फू. इतकी क्षमता आहे. तलावावर 40 हेक्‍टर लाभक्षेत्र आहे.

सद्यस्थितीत 14 टक्के पाणी शिल्लक आहे. शेंडूर लघु पाटबंधारे तलावातील 68 टक्‍के शिल्लक साठा वगळता करंजीवणे, बेनिक्रे, सोनाळी, हणबरवाडी व पिंपळगांव या पाच लघु पाटबंधारे तलावातील पाण्याचा शिल्लक साठा 40 टक्केच्या आत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com