परराज्यातील कामगारांना जिल्ह्यात राहू द्या, उद्योजकांचे निवेदन

Let The Foreign Workers Stay In The District, The Statement Of The Entrepreneur Kolhapur Marathi News
Let The Foreign Workers Stay In The District, The Statement Of The Entrepreneur Kolhapur Marathi News
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे, ज्या कामगारांना काम नव्हते, त्यांना आता काम सुरू होत आहे. त्यामुळे, परराज्यात जाणाऱ्या मजूर, कामगारांना जिल्ह्यात आसरा देऊन थांबवून घ्यावे, असे निवेदन जिल्ह्यातील सर्व चेंबर ऑफ कॉमर्स, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्‍चरर्ससह इतर संघटनांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. 

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील लहान-मोठे उद्योग सुरू झाले आहेत. याच उद्योगाला गती मिळत असतानाच पुणे, मुंबई येथील सर्व उद्योग बंद आहेत. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच परजिल्ह्यातील आणि परराज्यातील कोल्हापुरात असणाऱ्या कामगारांना त्यांच्या-त्यांच्या राज्यात आणि जिल्ह्यात पाठवले जात आहे. त्यामुळे सुरू झालेल्या उद्योगांना कामगारांअभावी मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे, हे कामगार काही दिवस कोल्हापूरमध्येच थांबवून ठेवले पाहिजेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा.

लॉकडाउननंतर अनेक समस्यांना आणि अडचणींना सामोरे जात आता कुठे व्यवसाय व उद्योग सुरू झाले आहेत. यातच कामगार जात असतील, तर आणखी बिकट परिस्थिती येणार आहे. लॉकडाउनमध्ये याच कामगारांना राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याकडेही लक्ष दिले होते. आता या कामगारांना शासन ज्या-त्या जिल्ह्यात रेल्वेने पाठवत आहे. याचा उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे जे लोक परजिल्ह्यात किंवा राज्यात जाणार आहेत. अशा कामगारांना काही दिवस आपल्याच जिल्ह्यात थांबवून ठेवले पाहिजे, असेही यामध्ये नमूद केले आहे.

यावेळी, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रिज, इन्स्टीट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमन, मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ऑफ कागल, हातकणंगले, इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन, श्री लक्ष्मी इंड. इस्टेट मॅन्यु. असोसिएशन व उत्कर्ष उद्योजक संस्था, इचलकरंजीच्या वतीने रणजित शाह, अतुल पाटील, सचिन शिरगावकर, गौरव माळी, संजय शेटे, सुमित चौगुले, काशिनाथ जगदाळे, संजय मालू, गणेश तांबे उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com