
लॉकडाउनच्या काळात वाहने बंद असल्याने हवेतील कार्बनचे प्रमाणही कमी झाले होते. या साठीच कार्बन उत्सर्जन टाळणे आवश्यक आहे.
चला शुद्ध हवा मिळवूया....!
कोल्हापूर : हवेमध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढल्यास हवेचे प्रदूषण होते. याचा परिणाम केवळ हवेवरच होते असे नाही तर त्यामुळे तापमानवाढ ही होते. जागतिक तापमानवाढीचे हे प्रमुख कारण आहे. लॉकडाउनच्या काळात वाहने बंद असल्याने हवेतील कार्बनचे प्रमाणही कमी झाले होते. या साठीच कार्बन उत्सर्जन टाळणे आवश्यक आहे.
शहरामध्ये कार्बनडाय ऑर्क्साडची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाहनांमुळे होते. ज्या वेळी कार्बनचे हवेतील प्रमाण वाढते त्यावेळी त्या परिसरावर कार्बनचा एक थर निर्माण होतो. याला हिट आयलॅंड असे म्हणतात. यामुळे त्या परिसरातील तापमानात वाढ होते. याचे वैश्विक स्वरूप म्हणजे जागतिक तपमान वाढ आहे.
कोल्हापूर शहराचा विचार करता गेल्या दहा वर्षात हवेतील कार्बनचे प्रमाण वाढत आहे. याबाबतचा सर्व्हेक्ष शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाने केले होते. त्यातून ही बाब समोर आली. कार्बनबरोबरच सल्फरडाय ऑक्साईट, नायट्रोजन डायऑक्साईट याचे ही प्रमाण वाढले आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात हवेतील या वायूंचे प्रमाण कमी झाल्याचे विद्यापीठाच्या सर्व्हेक्षणातून दिसून आले. कार्यालये आणि घरातील वातानुकूलीत यंत्रे यामुळेही मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते. हवेतील कार्बनचे प्रमाणात कमी झाल्यास हवेच्या प्रदुषणात घट होत असल्याचे लॉकडाउनमुळे दिसून आले आहे.
कॉर्बनडाय ऑक्साईडमुळे हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषीत होते. लॉकडाउनच्या काळात हवेतील कार्बनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हवा शद्धतेचे प्रमाण वाढले होते. प्रत्येकाने व्यक्तीगत पातळीवर कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहीजे.
- प्रा. डॉ. पी. डी. राऊत, पर्यावरण विभाग प्रमुख
हे करा...
- सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करा
- जवळच्या अंतरासाठी चालत जा
- कार्यालय, घर यामध्ये वातानुकूलीत यंत्रणेचा वापर टाळा
- कारखान्यांमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपाययोना करा
- शहरामध्ये झाडांचे प्रमाण वाढवा