कलापूरच्या चित्रपटसृष्टीचा वारसा जपूया 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : कलापूरच्या चित्रपटसृष्टीचा वारसा जपण्याचे काम चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ करत आहे. या उपक्रमातून चांगलेच विद्यार्थी घडतील, असा विश्वास महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांनी आज व्यक्त केला. येथील शाहू स्मारक भवनात चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि महानगरपालिकेच्या शिक्षण समितीतर्फे झालेल्या पाचव्या बालचित्रपट महोत्सवाचा समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

महोत्सवात महानगरपालिकेच्या 60 शाळांमधील 2600 विद्यार्थी सहभागी झाले होते. आज 'वॉटर हॉर्स', 'डम्बो' आणि 'डॉग्ज वे होम' हे सिनेमे दाखविण्यात आले.यावेळी 'शिनेमा पोरांचा' या पुस्तकाच्या प्रती संबंधित शाळांच्या शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आल्या. 

पद्मश्री दवे यांनी स्वागत केले. मिलिंद कोपार्डेकर यांनी प्रास्तविक केले. उदय संकपाळ यांनी आभार मानले. चिल्लर पार्टी प्रस्तुत देशी या लघुपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याबद्दल दिग्दर्शक रोहित कांबळे, निर्माता राजेंद्रकुमार मोरे, बालकलाकार गार्गी नाईक, इशान महालकरी, मनस्वी आडनाईक यांचा सत्कार झाला. 

विद्यार्थ्यांनी घेतली शपथ 
महोत्सवात सिनेमा पहायला आलेल्या अनेक मुलांनी खाऊ म्हणून कुरकुरेची प्लॅस्टिकबंद पाकिटे आणली होती. मात्र आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे सांगितल्यानंतर आणलेली पाकिटे जमा करून मुलांनी कुरकुरे न खाण्याची शपथ घेतली. दोन दिवसांत पाच बॉक्‍समध्ये जमा झालेले कुरकुरे नष्ट केले. सिनेमा संपल्यावर सहभागी सर्व मुलांना खाऊ देण्यात आला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's preserve the heritage of Kalapur's cinema