आज एक जानवर की, जान इन्सांनोने लि है... 

life of an animal is insomniac
life of an animal is insomniac
Updated on

गडहिंग्लज : केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यात भुकेने व्याकूळ झालेल्या गर्भवती हत्तीणीला अननसात फटाके घालण्यात आले, या नंतर 'त्या' हत्तीणीने जलसमाधी घेतल्याने प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे. ही घटना अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी असून मुक्‍या प्राण्याची अशा प्रकारे हत्या करणे जनावराच्या वृत्तीलाही न शोभणारे आहे.

माणुसकीला कलंकीत करणाऱ्या या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई गरजेची असल्याची मागणी करत या घटनेचा येथील हिरण्यकेशी नदीतील पाण्यात उभारून विविध संघटनांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. "आज एक जानवर की जान इन्सांनोने लि है, चुप क्‍यूं है संसार...' असा फलक हातात घेत, त्या हत्तिणीला आदरांजली वाहण्यात आली. 

फटाके तोंडात फुटल्याने तिचे तोंड व जीभ फाटली. अशा गंभीर जखमी अवस्थेतही ती हत्तीण कुणालाही इजा न करता वेल्लीयार नदीच्या मधोमध शांतपणे उभी राहिली. वन विभागाने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी पाण्यात डोके खुपसून निश्‍चिल उभी होती. तेथेच तीने जलसमाधी घेतली. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना, हिंदी है हम हिंदोस्ता हमारा परिषद, लकी ग्रुप, अमन युथ सर्कल, आझाद हेल्थ क्‍लब यांच्यावतीने हिरण्यकेशी नदीपात्रात उभे राहून जाहीर निषेध नोंदवला. 

गर्भातल्या पिलासह मृत हत्तीणीला हाथी मेरे साथी या चित्रपटातील "नफरत की दुनिया को छोड के प्यार की दुनिया में खूष रहना मेरे यार' हे शोक गीत लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रा. आशपाक मकानदार, मौलाना अजिम पटेल, मुन्ना सय्यद, इम्रान मुल्ला, युनूस नाईकवाडे, हैदर जमादार, शकील जमादार, मंजूर मकानदार, इर्शाद मकानदार, आशपाक किल्लेदार, फिरोज मणेर आदी उपस्थित होते. 

दृष्टिक्षेप 
- गडहिंग्लजमधील विविध संघटना आल्या एकत्र 
- हिरण्यकेशी नदीत उतरून अनोखा निषेध 
- हत्तीणीच्या मृत्यूच्या घटनेचा निषेध 
- जबाबदार मृत्यूस कारणीभूत व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com