esakal | बेळगाव जिल्ह्यात 4 दिवसात 31 गावठी दारू अड्डे उध्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

liquor dens destroyed in Belgaum district

हुल्यानूर, बुड्य्रानूर, धारावी याठिकाणी गावठी दारुची निर्मिती केली जाते. त्यानंतर ती सर्वत्र चोरट्या मार्गाने पुरविली जाते.

बेळगाव जिल्ह्यात 4 दिवसात 31 गावठी दारू अड्डे उध्वस्त

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव - जिल्ह्यातील गावठी दारु निर्मीती अड्डे आणि विक्रे अड्डे उध्दवस्त करण्यासाठी अबकारी खात्याने कंबर कसली आहे. गेल्या चार दिवसात सातत्याने धाडसत्र राबवून तब्बल 31 धाडी टाकण्यात आल्या. 175 लिटर गुळ रसायन आणि 10 लिटर गावठी दारु असा एकून पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आठ ठिकाणी जनजागृती करुन गावठीच्या दुष्परिणामाबद्दल लोकांना माहिती देण्यात आली.

पंजाबमध्ये गावठी दारुमुळे अनेक जणांचा बळी गेल्याची घटना घडल्यानंतर कर्नाटक अबकारी खाते खडबडून जागे झाले आहे. राज्यातून गावठी दारु पूर्णपणे हद्दपार करण्यात यावी, अशी सूचना अबकारी मंत्री एच. नागेश यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे अबकारी खात्याने गावठी दारु अड्ड्यावर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.

वाचा - जोतिबाला जाण्यासाठी आता 'या' रस्त्याचाच आधार  

तालुक्‍यातील हुल्यानूर, बुड्य्रानूर, धारावी याठिकाणी गावठी दारुची निर्मिती केली जाते. त्यानंतर ती सर्वत्र चोरट्या मार्गाने पुरविली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरु आहे. याठिकाणासह जिल्ह्यात चार दिवसात 31 ठिकाणी गावठी दारु अड्ड्यावर छापे टाकण्यात आले आहेत.
 

गावठी दारु निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई तिव्र मोहिती उघडण्यात आली आहे. चार दिवसात 31 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. गावठी दारु व गुळ रसायन जप्त करुन अड्डे उध्दस्त करण्यात येत आहेत.
- जयरामेगौडा, अबकारी उपायुक्‍त, बेळगाव