लॉजमध्ये क्‍वारंटाईन करण्याचा निर्णय झाला पण ती लोकं मात्र चिडली...

Locals are opposed to keeping quarantined people in lodges and hotels in the belgum city
Locals are opposed to keeping quarantined people in lodges and hotels in the belgum city
Updated on

बेळगाव - क्‍वारंटाईन केलेल्यांना शहरातील लॉज आणि हॉटेलमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यास स्थानिकातून तीव्र विरोध होत आहे. खडेबाजार रोडवरील श्रीनिवास लॉजमध्येही गुरुवारी (ता. 30) क्‍वारंटाईन केलेल्यांना ठेवण्यास नागरिकांनी विरोध दर्शविला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करुन जमावाची समजूत काढली. त्यानंतर नागरिक माघारी फिरले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. तबलिगींच्या संपर्कात आलेल्यांपैकी अनेकांची तपासणी करण्यात येत आहे. तशा संशयितांना क्‍वारंटाईन करण्यात येत आहे. काहींना होम क्‍वारंटाईन तर बहुतांश जणांना हॉटेल किंवा लॉजमध्ये क्‍वारंटाईन करण्यात येत आहे. दिवसेंदिवस क्‍वारंटाईन केलेल्यांची संख्या वाढत चालली असल्याने त्यांना ठेवण्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. तर शहरातील लॉज आणि हॉटेलमध्ये ठेवण्यास विरोध केला जात आहे. त्यामुळे स्थानिक आणि पोलिसांत शाब्दीक चकमक उडत आहे. खडेबाजार रोडवरील श्रीनिवास लॉजमध्ये क्‍वारंटाईन केलेल्यांना ठेवण्यात येणार असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली होती. त्यामुळे सकाळपासून नागरिक त्याठिकाणी एकत्र आले. कोणत्याही परिस्थितीत लॉजमध्ये क्‍वारंटाईन केलेल्यांना ठेवू नये. स्थानिकांना याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हणत विरोध करण्यात आला.

या घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलिस ठाण्याचे निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी घटनास्थळी भेट देऊन परस्थिती जाणून घेतली. लॉजमध्ये क्‍वारंटाईन केलेले लोक असतील. ते येथून कोठेही बाहेर पडणार नाहीत. तुम्हीही तुमच्या घरातून विनाकारण बाहेर पडू नका. अशा परिस्थितीत सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. विरोध करु नये. येथे जिल्हा प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेण्यात येईल, अशी ग्वाही निरीक्षक शिवयोगी यांनी दिल्यानंतर उपस्थित लोकांनी माघार घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com